Mumbai Police News Saam Tv
मुंबई/पुणे

New Year 2024: 'आम्ही सुद्धा 31 ची जय्यत तयारी केली आहे', मुंबई पोलिसांचं भन्नाट ट्वीट होतंय व्हायरल

Mumbai Police News: नवीन वर्ष सुरू होण्यास आता फक्त दोन तास शिल्लक राहील आहेत. अनेकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चांगलीच तयारी केली आहे. यातच 31 साठी मुंबई पोलीसही सज्ज झाली आहे.

Satish Kengar

Mumbai Police News:

नवीन वर्ष सुरू होण्यास आता फक्त दोन तास शिल्लक राहील आहेत. अनेकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चांगलीच तयारी केली आहे. यातच ३१ साठी मुंबई पोलीसही सज्ज झाली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई पोलिसांनीही जबरदस्त तयारी केली आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटवर अकाऊंटवरून एक पोस्ट करण्यात आली आहे. जी आता चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर लिहिलं आहे की,'आम्ही सुद्धा ३१ ची जय्यत तयारी केली आहे.'

या फोटोसह मुंबई पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''आमच्यासाठी तुमची सुरक्षा 'फर्स्ट’. मुंबईकरांनो, 'थर्टी फर्स्ट’च्या अनुषंगाने तुमच्या सुरक्षेसाठी आमची सर्व तयारी झाली आहे.'' मुंबई पोलिसांची ट्विटवर खूपच क्रिएटिव्ह असून ते नेहमीच असे ट्वीट करत असतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, नागरिकांना नववर्षाचे स्वागत सुरक्षितपणे करता यावे म्हणून मुंबई पोलीस दलाकडून २२ पोलीस उप आयुक्त, ४५ सहायक पोलीस आयुक्त, २०५१ पोलीस अधिकारी, ११५०० पोलीस अंमलदार तसेच एसआरपीएफ प्लाटून , क्यूआरटी. टीम, आरसीपी, होमगार्ड बंदोबस्थासाठी तैनात करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

कसं आहे वाहतुकीचे नियोजन?

नववर्षाचे स्वागत करताना वाहतूक सुरळीत राखण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ रात्री १२ ते १ जानेवारी २०२४ सकाळी ८ या वेळेत वरळी सी-फेस येथे पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (रिगल जंक्शन) ते गेट वे ऑफ इंडिया मार्गे दि बॉम्बे प्रेसिडेन्सी क्लब (रेडिओ क्लब) कडे जाणे करिता दक्षिण वाहिनी व त्याच मार्गाने परत येण्याकरिता (उत्तर वाहिनी) असे दोन्ही वाहिनी आपत्कालीन सेवेतील वाहने वगळूण इतर सर्व वाहतुकीस प्रतिबंद राहील. यासाठी शहीद भगतसिंग मार्ग - डावे वळण महाकवी भूषण मार्ग उजवे वळण - बोमन बेहराम मार्ग येथून पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT