Gas cylinder blast triggers three-storey chawl collapse in Bandra, Mumbai : मुंबईच्या वांद्रे भागात दुर्देवी घटना घडली आहे. घरातील गॅस सिलिंडरचा ब्लास्ट झाल्यामुळे तीन मजली चाळ पत्त्यासारखी कोसळली. मलब्या खाली १२ ते १५ जण अकडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चाळ कोसळल्याची माहिती मिळताच बचाव पथक आणि इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ बचावकार्य सुरू केले असून आतापर्यंत १० जणांना मलब्याखालून काढण्यात आले आहे. त्यांना जवळच्या भाभा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मलब्याखाली आणखी काही जण अडकले असल्याची भीती व्यक्ती करण्यात येत आहे. बचाव पथकाकडून मदतकार्य वेगात सुरू करण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वांद्रे पूर्वेतील भारत नगर परिसरातील चाळ क्रमांक 37 आज सकाळी 5:56 वाजता कोसळली. अग्निशमन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक यंत्रणेसह आठ अग्निशमन गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
वांद्रे पूर्वेतील भारत नगर परिसरात चाळीचा काही भाग कोसळल्याने अनेक जण जखमी झाले असून काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे.मुंबई पोलीस
मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत ढिगाऱ्यातून काढलेल्या 12 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी 7:50 वाजता घडली. प्राथमिक तपासात असे समजले आहे की, इमारतीत सिलेंडरचा स्फोट झाला, त्यानंतर इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. अग्निशमन विभाग, मुंबई पोलीस आणि बीएमसी यांच्याकडून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.