Mumbai Flood  Google
मुंबई/पुणे

Mumbai Flood Highlights : कोसळधार पावसामुळे मुंबईकरांना २६ जुलैची आठवण; अंगावर काटा आणणारा दिवस

26 july 2005 Mumbai Flood Highlights : मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना २६ जुलै २००५ सालच्या महापुराची आठवण झाली आहे. अंगावर काटा आणणारा दिवस आजही अनेकांच्या लक्षात आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईत राहणारी लोक २६ जुलै ही तारीख चुकूनही विसरणार नाही. १९ वर्षांपूर्वी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मुंबई ठप्प झाली होती. काही तासांच्या पावसाने अर्धे मुंबई शहर पाण्याखाली गेले होते. जीवघेण्या पावसात जीव वाचवण्यासाठी लोकांची धावाधाव सुरु होती. या पुरात अनेकांना जीव गमवावे लागले.

२६ जुलै २००५ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसहित महाराष्ट्रातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. जीवघेण्या पावसामुळे रेल्वे स्टेशनपासून विमानतळापर्यंत पाणीच पाणी होतं. या भयंकर पावसामुळे मुंबई ठप्प झाली होती. शाळा आणि कॉलेज बंद करण्यात आले होते.

या महापुरामुळे अनेकांना दोन दिवस घरातच राहावं लागलं होतं. घरे, दुकान, कारखाने,कंपन्यामध्ये पाणी शिरलं होतं. पावसाने त्यांचंही मोठं नुकसान केलं होतं. या जीवघेण्या पावसाने शेकडोंचा बळी घेतला होता. या पावसात मरण पावणाऱ्या लोकांचे मृतदेह अनेक दिवस पाण्यात तरंगत होते. अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती.

२६ जुलै २००५ सालचा जीवघेणा पाऊस

२६ जुलै २००५ साली दुपारी २ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. हा मुसळधार पाऊस दुसऱ्या दिवशी २७ जुलै २००५ रोजीच्या सकाळी ८.३० पर्यंत सुरु होता. या पूर्ण दिवसांत ९४४ मिलीमीटर अशा विक्रमी पावसाची नोंद झाली होती.

जीवघेण्या पावसामुळे मुंबईसह राज्यभरात ११०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. राज्यातील काही भागात महापुरामुळे संपूर्ण गाव वाहून गेलं होतं. यावेळी पाच लाखांहून अधिक जण बेघर झाले होते.

मुसळधार पावसामुळे मीठी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली होती. या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर तीन दिवस देशाच्या संपर्कात नव्हतं. या पूरानंतर साथीच्या आजाराने डोके वर काढले होते. यामुळेही अनेकांनी जीव गमावले.

या पावसात १३ लोकांचा स्वत:च्या वाहनातच बुडून मृत्यूमुखी झाले होते. या पावसाचा मोठा परिणाम रेल्वे आणि विमानसेवेवर झाला होता.

२६ जुलैच्या पावसामुळे मुंबईसह संपूर्ण राज्याला ५५० कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. या पावसाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. या भयंकर पावसाच्या आठवणीने आजही अनेकांच्या पोटात गोळा येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT