pimpri chinchwad news Saam tv
मुंबई/पुणे

Shocking : पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ; इमारतीच्या २४ व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

pimpri chinchwad news : पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. इमारतीच्या २४ व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे.

गोपाल मोटघरे

२५ वर्षीय तरुणाचा २४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

मृताचे नाव वैभव सुतार आहे

वैभव हा मित्राच्या घरी गेला होता

पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक समोर आली आहे. पुण्याच्या बाणेरमध्ये एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं होतं. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये एका तरुणाचा २४ व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाच्या मृत्यूने पिंपरी-चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत परिसरामध्ये बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. 25 वर्षाच्या एका तरुणाचा रावेत पोलिस स्टेशन हद्दीतील पेटकर सियोना या सोसायटीमधील २४ व्या मजल्यावरून खाली पडून दुर्देवी मृत्यू झाला.

वैभव सुतार असं या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे. वैभव सुतार याच्याकडे मृत्यूपूर्वी कोणतीही चिठ्ठी न सापडली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे. मात्र वैभव सुतार यांनी पेटकर सियोना इमारतीच्या 24 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, अशी तक्रार त्याच्या मित्रांनी रावेत पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

नेमकं काय घडलं?

वैभव सुतार हा बुधवारी रात्री त्याचा मित्र आणि उद्योजक सौरभ तापकीर यांच्या घरी गेला होता. त्या दरम्यान त्याने मध्यरात्री दीड ते दोन वाजता पेटकर सियोना इमारतीच्या 24व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, अशी मित्राने तक्रार केली आहे.

वैभवच्या मृत्यू प्रकरणी रावेत पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास रावेत पोलीस करत आहेत. कामानिमित्त मी बाहेर जातो, असं वैभव सुतार याने कुटुंबीयांना सांगितलं.त्यानंतर तो त्याच्या मित्र असलेल्या सौरभ तापकीरच्या घरी गेला होता. त्यादरम्यान तिथेही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: शिवसेना पक्षफुटीला 1999च्या पक्ष घटनेचा आधार; सुप्रीम कोर्टात शिंदेसेनेचा जोरदार युक्तीवाद

Thursday Horoscope : आज या राशींना मिळणार मोठी संधी! तुमची रास यात आहे का? वाचा एका क्लिकवर

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

SCROLL FOR NEXT