Mumbai; MBBS च्या 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण...  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai; MBBS च्या 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण...

मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेज मधील 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेज मधील 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व 22 विद्यार्थी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकतात आहेत. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

गेल्या २- ३ दिवसांतच सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. क्रीडास्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याने कोरोनाचा प्रसार झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आली आहे. तर या ठिकाणी असलेल्या वसतीगृह हे सील करण्यात आली आहेत.

हे देखील पहा-

बुधवारी मुंबईमध्ये ५२७ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर ६ कोरोना बाधित लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांमुळे बाधितांची एकूण संख्या ७ लाख ४२ हजार ५३८ झाली आहे. तर ४०५ रुग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७ लाख १९ हजार २१८ झाली आहे. सध्या मुंबईमध्ये ४ हजार ७२४ जण उपचार घेत आहेत.

तर ठाणे जिल्ह्यात बुधवारी ३१५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ३१५ कोरोना रुग्णांपैकी कल्याण- डोंबिवली ९६, ठाणे ७६, नवी मुंबई ५६, मीरा- भाईंदर ३३, ठाणे ग्रामीण २१, बदलापूर १८, अंबरनाथ ७, उल्हासनगर ७ आणि भिवंडीमध्ये १ रुग्ण आढळून आला आहे. तर, ३ मृतांपैकी ठाणे आणि कल्याण- डोंबिवली आणि भिवंडी मधील प्रत्येकी १- १ रुग्णाचा समावेश आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT