Indian Railway News , Mumbai crime News in Marathi, Mumbai Latest News in Marathi saam tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! धावत्या रेल्वेत तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

धावत्या रेल्वेमध्ये एका २० वर्षीय तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघर: धावत्या रेल्वेमध्ये एका २० वर्षीय तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये (Mumbai) घडली आहे. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास डहाणू रोड आरएस येथे स्वराज्य एक्सप्रेसमध्ये (Swarajya Express) तरूणीचा मृतदेह आढळून आला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर आसपासच्या प्रवाशांनी (passengers) या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनला देण्यात आली. यानंतर रेल्वे (Railways) कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाऱ्यांनी संबंधित कोचचा दरवाज उघडला असता, २० वर्षीय तरूणी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. (Mumbai crime News in Marathi)

हे देखील पाहा-

रेल्वे मुंबईतील (Mumbai) वांद्रे टर्मिनस ते जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) श्री माता वैष्णो देवी कटरा पर्यंत जाणार होती. दरम्यान रविवारी दुपारी सव्वा १ वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच या गाडीला डहाणू रोड स्थानकात दुपारी १ वाजून १० मिनिटांनी विशेष थांबा देण्यात आला. याठिकाणी तरुणीचा मृतदेह उतरवण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने दिली आहे.

ही तरुणी बिहार मधील रहिवाशी असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते सुमित ठाकूर यांनी यावेळी दिली आहे. मृत तरूणी आरतीचा मृतदेह टॉयलेटमध्ये आढळल्यामुळे प्रवाशांनी याविषयी रेल्वे प्रशासनाला कळवले. यानंतर डहाणू रोड स्थानकात ही रेल्वे थांबवण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे. या तरूणीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२.३५ च्या सुमारास पश्चिम रेल्वेकडे स्वराज एक्स्प्रेसविषयी एक महत्वाचा कॉल आला. २१ वर्षीय मुलगी वॉशरुमला गेली होती पण बराच वेळपर्यंत ती परतली नाही, अशी माहिती या कॉलवरून देण्यात आली. यानंतर या गाडीला डहाणू रोड स्थानकात दुपारी १ वाजून १० मिनिटांनी विशेष थांबा देण्यात आला. रेल्वे डहाणू येथे थांबल्यावर कर्मचाऱ्यांनी ती तरुणी ज्या डब्यात होती, त्या डब्यातील बंद असलेल्या वॉशरुमचं लॉक तोडले. त्यावेळी संबंधीत तरुणी वॉशरुममध्ये पडलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या गळ्याला एक कपडा गुंडाळलेला होता. यानंतर तिला तातडीने बाहेर काढत येथील डहाणू कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पालघर रेल्वे पोलीस या प्रकरणाविषयी पुढील तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

SCROLL FOR NEXT