कल्याण : लखनऊ- मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. इगतपुरी ते कसारा या स्थानकांदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आले आहे. आता पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ- मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दरोडा पडला आहे.
हे देखील पहा-
७ ते ८ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करत प्रवाशांना चांगलेच लुटले आहे. १५ ते २० प्रवाशांना यावेळी लुटण्यात आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली होती. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यावर ट्रेन बोगद्याजवळ पोचली होती. त्यावेळेस ट्रेन स्लो असल्यामुळे ७ ते ८ जण ट्रेनमध्ये चढले होते. त्यांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी चांगलंच बेदम मारहाण करायला सुरुवात केली आहे. दरोडेखोरांचा हातात फाइटर आणि बेल्ट हे शस्त्र होते. अनेक प्रवाशांना या दरोडेखोरांनी चांगलेच लुटले आहे. मात्र, १५ ते २० प्रवासी सध्या समोर आले आहेत. धक्कादायक म्हणजे एका प्रवाशी महिलाबरोबर दरोडेखोरांनी छेडछाड करण्यास सुरवात केली.
या घटनेतील सर्व आरोपी हे नाशिकचे असल्याचे समोर आले आहे. प्रकाश पारधी (वय- २०) त्र्यंबकर रोड, इगतपुरी, अर्षद शेख(वय- १९) मालडचा राहणारा अक्कू (घोटी नाशिक), पव्या (घोटी नाशिक), काल्या (घोटी नाशिक), गुड्या (टाकेत गाव), राहुल (टाकेत गाव), कळश्या (घोटी नाशिक) पीडित महिलेच्या नवऱ्याला लोखंडी राँडने मारहाण करून, त्यांच्या समोरच पत्नीलाल चाकू आणि ब्लेडचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे.
या २० वर्षीय तरुणीची विनयभंग झाल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. काही धाडसी प्रवाशांनी ४ दरोडेखोरांना पकडून ठेवले आहे. ट्रेन कल्याण स्थानकामध्ये येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले आहे. ४ दरोडेखोर कल्याण या ठिकाणी ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. उर्वरित आरोपींच्या पोलिस शोध घेत आहेत. कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परत एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.