Bocavirus Patient Found In Navi Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Bocavirus In Navi Mumbai : सावधान! नवी मुंबईत बोका व्हायसरचा शिरकाव; 'ही' आहेत लक्षणे

Bocavirus Patient Found In Navi Mumbai: बोकाव्हायरसचा पहिला रुग्ण २००५ मध्ये आढळला होता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

Bocavirus Latest News: नवी मुंबईकरांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. नवी मुंबईत बोका व्हायरसचा (Bocavirus) शिरकाव झाला आहे. दोन वर्षांच्या बाळाला या व्हायरसची लागण झाली आहे. या बाळावर खारघरमधील (Kharghar)मेडीकव्हर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोका व्हायरस हा दुर्मिळ व्हायरस असून, एक ते तीन वयोगटातील मुलांना त्याची लागण होते. (Navi Mumbai Latest News)

बोकाव्हायरची लक्षणे

मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांच्या मुलाला आपत्कालीन स्थितीत रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्याला श्वास घेण्यास गंभीर त्रास होत होता. त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ८८ टक्क्यांवर आली होती. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार या चिमुकल्याला आठवडाभरापासून सर्दी-खोकला होता.

या बाळाला श्वसनाचा तीव्र त्रास होत होता. त्यामुळे त्वरित हाय-फ्लो ऑक्सिजन, स्टिरॉइड्स, नेब्युलायझेशन आणि लक्षणात्मक उपचार सुरू केले गेले. विविध तपासण्या केल्यानंतर त्याचा बोकाव्हायरस संसर्गाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. (Tajya Batmya)

बोकाव्हायरस बद्दल

बोकाव्हायरसचा पहिला रुग्ण २००५ मध्ये आढळला होता. बोकाव्हायरसमध्ये टाइप एक, टाइप दोन आणि टाइप चार यांसारखे अनेक प्रकार आहेत. टाइप १ विषाणू प्रामुख्याने श्वसनमार्गाच्या संसर्गाशी संबंधित आहे. वैद्यकीय उपचार केलेल्या मुलाला टाइप एक विषाणूची बाधा झाली होती. टाइप दोन आणि चार यामध्ये अतिसार, ओटीपोटात दुखणे या लक्षणांसह गॅस्ट्रोएन्टरोलॉजी म्हणजे पोटाच्या विकाराशी संबंधित संसर्ग असल्याचे दिसून आले आहे. हा विषाणू प्रामुख्याने तीन वर्षांखालील मुलांना संक्रमित करतो. खोकला, सर्दी आणि श्वसनमार्गाचे संक्रमण ही लक्षणे दिसून येतात.

लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी

गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईत बोकाव्हायरस संसर्गाचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. हा दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग असला, तरीही योग्य वेळी त्याचे निदान न केल्यास प्रकृती गंभीर होऊन मृत्यू ओढवू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. याबाबत पनवेल महापालिका आरोग्य विभागाने हा रुग्ण बोका व्हायरस सदृश्य व्हायरसने पीडित असल्याचे स्पष्ट केले असून लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

SCROLL FOR NEXT