पुण्यातील त्या' दुष्कृत्यात 2 रेल्वे कर्मचारी आणि 6 रिक्षा चालकांचा समावेश! सागर आव्हाड
मुंबई/पुणे

पुण्यातील त्या' दुष्कृत्यात 2 रेल्वे कर्मचारी आणि 6 रिक्षा चालकांचा समावेश!

पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून रेल्वेतील दोन कर्मचारी तसेच रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

पुणे : पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून रेल्वेतील दोन कर्मचारी तसेच रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी 8 आरोपींना अटक केली आहे.

याप्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 13 वर्षीय पिडीत मुलीने तक्रार दिली आहे. 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी 31 ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक Pune Railway Station परिसरात आली होती. त्यावेळेस रात्री तिला त्या आरोपींनी आता गाडी मिळणार नाही, तू गावी कशी जाणार असे म्हणत, आम्ही तुझी येथे राहण्याची व्यवस्था करतो. असे सांगितले आणि बाहेर आणले. त्यावेळेस तिचे अपहरण केले आणि तिला वानवडी Wanavadi परिसरात आणलं आणि त्याठिकाणी आरोपींनी रात्री तिच्यावर बलात्कार Rape केला. तसेच, दुसऱ्या दिवशी देखील तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.

एकूण 7 आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला आणि हा प्रकार काल उघडकीस आला आहे. त्यानंतर वानवडी पोलीसांनी तात्काळ या आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी त्यांना अटक देखील केली आहे. तर या आरोपींमध्ये त्यावेळी दोन रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे वृत्त समोर आले आहे. तर, इतर आरोपी हे रिक्षा चालक आहेत. दरम्यान, त्यांना या लाजिरवाण्या दुष्कृत्यात सहाय्य करणाऱ्यांचा देखील पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे-सीएसएमटी लोकल बंद

Majalgaon Dam : माजलगाव धरण ५६ टक्के भरले; बीडसह माजलगावची पाण्याची चिंता मिटली

EPFO: पीएफचे पैसे कधी आणि कसे काढू शकतात? EPFO चा नियम काय सांगतो

Mumbai Crying Club: मुंबईमध्ये सुरु झाला पहिला 'क्रायिंग क्लब'; तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी घेतली जाते जपानच्या प्रथेची मदत

Mumbai Rain : पावसाचा हाहा:कार! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एलबीएस मार्ग बंद, कुर्लामध्ये कमरेइतके पाणी; धडकी भरवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT