Mankhurd RPF soldier News
Mankhurd RPF soldier News Twitter/@ANI
मुंबई/पुणे

Video: चालत्या लोकलमधून महिलेचा तोल गेला, पण 'तो' देवदूतासारखा आला; आई-बाळाचा वाचला जीव

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Mumbai Latest News: मुंबईमध्ये मोठा दुर्देवी अपघात टळला आहे. आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे एका महिलेचे तिच्या मुलासह प्राण वाचले आहेत. मुंबईतील मानखुर्द रेल्वे स्टेशन येथे एक महिला ही आपल्या लहान मुलासह लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) चढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिचा तोल गेल्याने ती खाली पडली. यामुळे मोठा अपघात होऊन महिलेसह तिच्या मुलाच्या जीवावर बेतले असते. मात्र, दोन आरपीएफ जवान देवदूताप्रमाणे आले आणि आईसह मुलाचेही प्राण वाचवले. (Mumbai Local News)

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर ही घटना घडली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरॅत रेकॉर्ड झाला आहे. सदर महिला ही आपल्या लहान मुलाला घेऊन ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करते पण ट्रेनमध्ये भरपूर गर्दी असते. कशीबशी ती आपल्या मुलासह ट्रेनमध्ये चढते पण तिची तोल जातो आणि इतक्यात ट्रेन सुरू होते. यावेळी आरपीएफ (Railway Protection Force) गुन्हे शाखेचे कर्मचारी अक्षय सोये गस्तीवर होते. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी चपळाई दाखवत चालत्या ट्रेनजवळ धाव घेतली.

पाहा थरारक व्हिडिओ -

यावेळी त्यांनी केलेल्या धाडसामुळे आई आणि तिचा मुलगा या दोघांचेही प्राण वाचले आहेत. आरपीएफ जवानाने मोठ्या हिंमतीने मुलाचे प्राण वाचवले आहेत. काल दुपारी हा अपघात घडला, ही संपूर्ण घटना स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान आरपीएफ जवान अक्षय सोये यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT