मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावर २ दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. हा रात्रकालीन ब्लॉक असला तरी देखील यामुळे लोकलसेवा आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांवर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी लोकल आणि ट्रेनचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे.
मध्य रेल्वे मार्गावर २१ - २२ डिसेंबर म्हणजेच शनिवार- रविवारच्या मध्यरात्री आणि २२-२३ डिसेंबर म्हणजेच रविवार-सोमवारच्या मध्यरात्री रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कल्याण आणि कल्याण - कर्जत विभागावर गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कल्याण आणि कल्याण- कर्जत विभागात अप आणि डाउन धिम्या आणि जलद मार्गांवर, पाचव्या आणि सहाव्या मार्गावर काम करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर २१ - २२ डिसेंबरला मध्यरात्री १ ते ४.३० वाजेपर्यंत विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये तिसरा नवीन पत्रीपूल रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकांदरम्यान, उल्हासनगर येथे १२ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिज, कल्याण आणि अंबरनाथ दरम्यान लेव्हल क्रॉसिंग (एलसी) गेटच्या जागी आरओबी आणि नेरळमध्ये ६ मीटर रुंद एफओबी हे काम करण्यात येणार आहे.
या ब्लॉकमुळे मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या नियमनामध्ये बदल करण्यात आले आहे. ट्रेन क्रमांक ११०८७ डाउन वेरावळ- पुणे एक्सप्रेस भिवंडी स्थानकावर १० मिनिटांसाठी नियमित केली जाईल.
खालील डाऊन गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५ व्या मार्गिकेवर वळवण्यात येतील -
ट्रेन क्रमांक १२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस- हटिया एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक २२१७७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी महानगरी एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक २२५३८ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस
ईशान्य दिशेकडून येणाऱ्या अप गाड्या कल्याण आणि दिवा/ठाणे स्थानकांदरम्यान ६व्या मार्गावर वळवण्यात येतील -
ट्रेन क्रमांक १८०३० शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक १२८१० हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस
गाडी क्रमांक २०१०४ गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक ११४०२ बल्हारशाह - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्स्प्रेस
दक्षिण-पूर्व दिशेकडून येणाऱ्या अप गाड्या कर्जत- पनवेल मार्गे वळवल्या जातील आणि पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबवल्या जातील -
ट्रेन क्रमांक ११०२० भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक १८५१९ विशाखापट्टणम - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक १२७०२ हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसैन सागर एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक १११४० हॉस्पेट - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस
मध्य रेल्वे मार्गावर २२ - २३ डिसेंबरला मध्यरात्री २ ते ५.३० वाजेपर्यंत विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. गर्डर लाँच करण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. तिसरा नवीन पत्रीपुल रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकांदरम्यान हा गर्डर लाँच करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत कल्याण आणि ठाणे विभागांमध्ये उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
ट्रेन क्रमांक १८०३० अप शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक १२८१० अप हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस अनुक्रमे टिटवाळा आणि खडवली स्थानकांवर १५ मिनिटांनी नियमित केली जातील. तर ट्रेन क्रमांक १२१३२ अप साईनगर शिर्डी - दादर एक्स्प्रेसही उशिराने धावणार आहे.
गाडी क्रमांक ११०२० भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस कर्जत-पनवेल मार्गे वळवली जाईल आणि पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबवली जाईल.
गाडी क्रमांक ११०२० वगळता सर्व सहाव्या मार्गावरील मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि दिवा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर चालतील.
२१ डिसेंबरला खालील उपनगरीय गाड्यांचे विस्तारित /शॉर्ट टर्मिनेटेड -
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- टिटवाळा लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.१६ वाजता सुटून कसारापर्यंत चालेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टिटवाळा लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.४२ वाजता सुटेल आणि ती ठाणेपर्यंत चालेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- बदलापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.५१ वाजता सुटेल.
बदलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल बदलापूर येथून २१.५८ वाजता सुटेल.
अंबरनाथ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ येथून २२.१५ वाजता सुटेल.
टिटवाळा - ठाणे लोकल टिटवाळा येथून २३.१४ वाजता सुटेल.
२२ डिसेंबरला उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट ओरीजनेट -
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- आसनगाव ही आसनगाव येथे ०८.०७ वाजता येणारी लोकल कल्याण येथून सुटेल.
टिटवाळा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०५.४० वाजता येणारी लोकल ठाणे येथून सुटेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अंबरनाथ लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.०२, ०५.१६ आणि ०५.४० वाजता सुटणार.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कसारा लोकल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०.०८ वाजता सुटते.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता सुटणारी.
- अंबरनाथ- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी अंबरनाथ येथून ०३.४३ आणि ४.०८ वाजता सुटणारी.
- कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी कर्जत येथून ०२.३० आणि ०३.३५ वाजता सुटेल आणि
- कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी कल्याण येथून ०४.३९ वाजता सुटेल.
- दक्षिण-पूर्व दिशेसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.३० वाजता सुटते.
- ईशान्य दिशेसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.१६ वाजता सुटेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.