Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Tarapur: विराज प्रोफाइल कंपनीतील राड्यात १९ पाेलीस जखमी; २७ कामगार अटकेत

१०० ते १५० कायम कामगारांच्या गटाने विराज कंपनीच्या आतमध्ये प्रवेश केला हाेता.

साम न्यूज नेटवर्क

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीतील (tarapur midc) विराज प्रोफाइल कंपनीत (viraj profile ltd) शनिवारी झालेल्या कामगारांमधील (workers) राड्यात आणि त्यानंतर पाेलीसांवर झालेल्या हल्ल्यात एकूण १९ पाेलीस (police) कर्मचारी जखमी (injured) झाले. या घटनेत जमावाने १२ वाहनांचे नुकसान केले. आज (रविवार) येथील परिस्थिती नियंत्रणात असून एकूण २७ हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पालघर पाेलीसांनी (palghar police) दिली. (palghar latest marathi news)

विराज प्रोफाइल कंपनीतील एक कामगार संघटना १६ मेपासून काम बंद आंदाेलन छेडणार आहे. त्याबाबतची नोटीस संघटनेने प्रशासनास दिली आहे. या आंदाेलन काळात कंपनी कंत्राटी कामगारांद्वारे काम सुरू ठेवेल अशी शंका कंपनीत कायमस्वरुपी असलेल्या कामगारांना होती. त्यामुळे संपाच्या काही कायम कामगारांनी गेल्या काही दिवसांपासून उत्पादन बंद केले आहे. त्यानंतर उत्पादन बंद ठेवणाऱ्या कामगारांनी कंपनीच्या आवारापासून ५० मीटर अंतर दूर राहावे असे आदेश न्यायालयाने दिले.

त्यानंतर कंपनीत राडा झाला. या राड्यात पाेलीस देखील माेठ्या प्रमाणात जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २७ जणांना अटक केली आहे. संबंधितांवर हत्येचा कट रचणे, तोडफोड करणे, जीवित व मालमत्तेचे नुकसान करणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पालघर पोलिसांच्या वतीने सचिन नावडकर (sachin navadkar) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

SCROLL FOR NEXT