Mumbai corona update Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईत कोरोना फोफावतोय! नव्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ, नागरिक चिंताग्रस्त

दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : येथे कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (Mumbai corona update) होणारी वाढ चौथ्या लाटेला आमंत्रण करणारी असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे.आजही मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईत कोरोनाचे १८०३ नवे (Corona new patients) रुग्ण आढळले आहेत.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मु्ंबईत आज दिवसभरात कोरोनाचे नवे १८०३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील आजपर्यंतचा कोरोना बाधितांचा आकडा १०८०७४७ वर पोहोचला आहे. आज दोन रुग्णांचा मृत्यू (corona death) झाल्याने कोराना मृतांची संख्या १९५७३ वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आज १११ कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. तर ९५९ रुग्ण हे कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १०५०२८५ एवढी झाली आहे. कर बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, मुंबईत कोरोनाचे एकूण १०८८९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्ण दुपटीचा दर ५१३ दिवसांवर पोहोचला आहे. तसेच कोविड वाढीचा दर (५ जून- ११ जून) ०.१३३% एवढा झाला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT