Corona Patients in Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

मुंबई कोरोनाच्या विळख्यात; आजची आकडेवारी धडकी भरवणारी

गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : येथे कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (Mumbai corona update) होणारी वाढ चौथ्या लाटेला आमंत्रण करणारी असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांची धास्ती वाढली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. आजही मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईत कोरोनाचे नवे १७४५ (Corona new patients) रुग्ण आढळले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आज कोरोनाच्या १७४५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय.त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा १०७८०२२ वर पोहोचला आहे. तर आज एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना मृतांचा आकडा १९५७१ एवढा झाला आहे.

दरम्यान, मुंबईतील कोरोना बाधितांची आजपर्यंतची संख्या १०७८०२२ एवढी झाली आहे. तर कोरोनातून बरे झालेले रुग्णांची संख्या १०४८४०४ वर पोहोचली आहे. तसेच मुंबईतील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १००४७ झाली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT