Navi Mumbai Swimming Pool Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai News: स्विमिंग पुलात बुडून १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; नवी मुंबईतील वाशी परिसरातील घटना

Navi Mumbai Breaking News: स्विमिंग पुलात बुडून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नवी मुंबईतील वाशी परिसरात घडली.

Satish Daud

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही नवी मुंबई

Navi Mumbai Swimming Pool

स्विमिंग पुलात बुडून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नवी मुंबईतील वाशी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरु केला आहे. मयूर डमाळे (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. (Breaking Marathi News)

मयूर हा मूळ नेरूळ येथील रहिवासी असून अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, फादर अग्नेल शाळेतील ३० ते ४० विद्यार्थी शनिवारी (ता. १३) दुपारी १ वाजेच्या सुमारास क्रीडा तासिकेसाठी नवी मुंबईतील (Navi Mumbai) वाशी तरण तलावात आले होते.

येथे मुलांना पोहण्याचे धडे दिले जाणार होते. त्यासाठी क्रीडा शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्विमिंग पुलात उतरवले आले. दरम्यान, शिक्षकांच्या सल्ल्यानुसार काही विद्यार्थ्यांनी पोहण्यासाठी स्विमिंग पुलात उडी घेतली आणि सराव करू लागले.

दुसरीकडे मयूर याला पोहता येत नव्हते. इतर मुलांप्रमाणे आपल्याला पोहता यावे, या आशेने मयुरनेही स्विमिंग पुलाच्या (Swimming Pool) पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता-पोहता तो खोल पाणी असलेल्या क्षेत्रात गेला व तेथेच बुडाला. (Latest Marathi News)

बराच वेळ होऊनही मयूर बाहेर न आल्याने उपस्थित प्रशिक्षक, शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. यावेळी मयूरचा स्विमिंग पुलाच्या पाण्यात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे मयूरचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत प्रयत्न करूनही संबंधीत शाळा प्रतिनिधीची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Water For Glowing Skin: सकाळी उठल्यानंतर प्या तुळशीच्या पानांचे पाणी, चेहरा दिसेल तेजस्वी

Maharashtra News Live Update: अजितदादाचं निवडणूक लढवत आहे, असं समजा... सुनेत्राकाकीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार, काँग्रेसने माघारीसाठी काय अट ठेवली?

High Blood Pressure: BP च्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने वाढतील हे ४ आजार, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती

School News: पालकांची दिशाभूल करणाऱ्या शाळांना चाप बसणार; शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT