Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेला तो परातलाच नाही; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Boy Drown In Indrayani River: इंद्रायणी नदीपात्रात पोहण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला.

दिलीप कांबळे

Maval News : सध्या वातावरणात उष्णता वाढल्याने सूर्य आग ओकू लागला आहे. शरीराची लाही लाही होत आहे. शरीराला थंडावा मिळावा यासाठी इंद्रायणी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या सतरा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

पोहण्याचा मोह या मुलाच्या जीवावर बेतला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हर्ष अडसुळे,असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पुण्याच्या (Pune) दापोडी येथून पाच पर्यटक मावळ (Maval) परिसरात फिरण्यासाठी आले असता ते सर्व जण कामशेतच्या इंद्रायणी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले होते.

यावेळी हर्ष याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलीस (Police) स्टेशनचे कर्मचारी आणि वन्यजीव मावळ रक्षक संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि आपदा मित्र मावळ हे घटनास्थळी पोहोचले.

पाण्यात बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर बुडालेल्या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास यंत्रणांना यश आले आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्ष याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT