महाराष्ट्र हादरला! डोंबिवलीत 15 वर्षीय तरुणीवर 29 जणांकडून बलात्कार Saam Tv
मुंबई/पुणे

महाराष्ट्र हादरला! डोंबिवलीत 15 वर्षीय तरुणीवर 29 जणांकडून बलात्कार

डोंबिवली, बदलापुर, मुरबाड व रबाळे या परीसरात 15 वर्षीय मुलीवर 29 जणांनी बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्रदिप भणगे

डोंबिवली : संस्कृतीक शहरात काळिमा फासणारी घटना घडली आहे.डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे.याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह 26 जणांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपिंमध्ये राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांची नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे.  प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलिवर बलात्कार करत व्हिडियो काढला. या व्हिडिओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी बलात्कार केल्याचे सध्या समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

डोंबिवली ग्रामीण परिसरात एका लैंगिक अत्याचाराच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे . डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात तिच्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरू असल्याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेत चौकशी सुरू केली. या चौकशीमध्ये जे समोर आलं ते ऐकून पोलीस हैराण झाले . जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराणे बलात्कार करत तिचा व्हिडियो काढला . हा व्हिडियो या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला. या व्हिडियोच्या आधारे आतापर्यंत 29 जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत, वेगवेगल्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला गेला. मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतलं आहे त्यामधील दोन अल्पवयीन आहेत. 21 आरोपींच्या अटकेनंतर पोलीस आता सहा आरोपींच्या शोधात आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hedavi Travel : अथांग पसरलेला समुद्रकिनारा अन् गणेशाचे मंदिर; कोकणातील पर्यटनाची शोभा वाढवते हेदवीचं सौंदर्य

Maharashtra Live News Update : रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर

Dal Bhaji Recipe : विदर्भात बनवतात तशी चमचमीत डाळ भाजी, हिवाळ्यात एकदा ट्राय कराच

जीवाशी खेळ! पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना; पोलिसांकडून कारवाईत १ कोटींचा मुद्देमाल जप्त

Akola News: अकोल्यात विद्यार्थ्यांकडून पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे? व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT