Rain Saam tv
मुंबई/पुणे

अतिवृष्टीचा हाहाकार! नालासोपाऱ्यात साचलेल्या पाण्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Nalasopara Rain Horror: वसई-विरारमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यात साचलेल्या पाण्यात १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Namdeo Kumbhar

वसई-विरार शहरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. नालासोपारा येथे साचलेल्या पाण्यात बुडून एका १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे गेल्या पाच दिवसांत वसई-विरार परिसरात घडलेली ही तिसरी जीवघेणी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मित्रांसोबत पोहायला गेला अन् घात झाला

नमन केसरवाणी (वय १३, रा. जयअंबे चाळ, वलईपाडा, नालासोपारा पूर्व) असे मृत मुलाचे नाव आहे. सततच्या पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याने नमन आपल्या मित्रांसोबत बाहेर फिरण्यासाठी गेला होता. नालासोपारा पूर्वेतील गरळपाडा परिसरातील एका मोठ्या मैदानात पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. या पाण्याचा अंदाज न आल्याने नमन पोहत असताना पुराच्या प्रवासात वाहून गेला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेची नोंद पेल्हार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण पालघर जिल्ह्यासह वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात पावसाने रुद्ररूप धारण केले आहे. सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागात ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी साचले असून अनेक सोसायट्या आणि रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून सखल भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने पालघर परिसरासाठी अतिवृष्टीचा इशारा (Alert) कायम ठेवला असून, नदी-नाले आणि पाणी साचलेल्या मैदानांच्या परिसरात नागरिकांनी, विशेषतः लहान मुलांनी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पालघरमध्ये अतिवृष्टीचा बळीराजाला मोठा फटका

पालघर जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी भात पेरणी वेगाने पूर्ण केली होती. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरलेली महागडी भात बियाणं पाण्याच्या तीव्र प्रवाहासोबत वाहून गेली आहेत. ज्या शेतकऱ्यांची रोपे थोडी मोठी झाली होती, ती रोपे सलग कित्येक दिवसांपासून पाण्याखाली तुंबून राहिल्याने आता शेतातच कुजण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले असून, लागवडीचा खर्च वाया गेल्याने आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT