11th admission, pune, ssc result, fyjc   online admission
11th admission, pune, ssc result, fyjc online admission Saam Tv
मुंबई/पुणे

Mission Admission : अकरावी प्रवेशासाठी आठ जूनपासून भरावे लागणार पसंतीक्रम; जाणून घ्या वेळापत्रक

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune News : पुणे (pune) आणि पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे (FYJC 11th Online Admission) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानूसार विद्यार्थ्यांना येत्या ८ जूनपासून अर्जाचा भाग दोन म्हणजे महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरावे लागणार आहेत. या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत सुमारे ४५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. येत्या १९ जून रोजी प्रवेशाची निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच निवड यादीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २२ जून दरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता येईल असे कळविण्यात आले आहे. (Maharashtra News)

इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. आता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थी येत्या 8 जूनपासून नाेंदणी करु शकतात. 11वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असलेल्या शहरी क्षेत्रांतील प्रवेश फेऱ्यांची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी https://11thadmission.org.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावयाचे शहर निवडावे आणि प्रवेशासाठी आवश्यक पुढील कार्यवाही करावी.

कोटांतर्गत प्रवेशाचे वेळापत्रक (Quota Admission Schedule)

8 जून 2023, सकाळी 10 वाजल्यापासून दिनांक 12 जून 2023 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत कोटाअंतर्गत प्रवेश घ्यावयाचा असेल तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंती नोंदविणेची सुविधा (Apply for Quota) विद्यार्थी लॉग इनमध्ये देण्यात आलेली आहे.

13 जून 2023 कोटा पसंती दिलेल्या विद्यार्थ्यांची कोटवार गुणवत्ता यादी तयार होईल प्रवेशासाठी पात्र आणि प्रतिक्षेतील विद्यार्थ्यांची यादी विद्यालय स्तरावर प्रदर्शित करणे निवडलेल्या विद्यार्थ्यांना कोटाअंतर्गत प्रवेशासाठी फोन करणे (विद्यालय स्तरावरील कार्यवाही) 13 जून 2023 ते 15 जून 2023, सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यालयांना या कालावधीत (व्यवस्थापन, इनहाऊस आणि अल्पसंख्यांक) कोटाअंतर्गत प्रवेश निश्चित करता येतील.

कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीनुसार संबंधित विद्यालयात आपला प्रवेश निश्चित करणे विद्यालयांना व्यवस्थापन कोटा व इन-हाऊस कोटा यामधील रिक्त जागा CAP कडे प्रत्यार्पित करता येतील.

16 जून 2023 ते 18 जून 2023

कोटानिहाय रिक्त जागा विद्यालय स्तरावर जाहीर केल्या जातील.

कोटाअंतर्गत प्रवेश घ्यावयाचा असलेले विद्यार्थी आपली पसंती नोंदवतील

कोटा प्रवेशासाठी यापूर्वी नोंदवलेली पसंती विद्यार्थ्यांना बदलता येईल

19 जून 2023 (फेरी 1)

कोटा पसंती दिलेल्या विद्यार्थ्यांची कोटावार गुणवत्ता यादी तयार करतील

प्रवेशासाठी पात्र / निवडलेले आणि प्रतिक्षेतील विद्यार्थ्यांची यादी विद्यालय स्तरावर प्रदर्शित करणे.

निवडलेल्या विद्यार्थ्यांना कोटांतर्गत प्रवेशासाठी फोन करणे (विद्यालय स्तरावरील कार्यवाही)

19 जून 2023 सकाळी 10 वाजल्यापासून ते 22 जून 2023 सायंकाळी 6 पर्यंत या कालावधीत कोटांतर्गत प्रवेश निश्चित केले जातील.

कोणत्याही कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरल्यास आपला प्रवेश निश्चित करणे. ज्या विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी Apply केलेले आहे व ते प्रवेश घेऊ इच्छितात ते विद्यार्थी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाशी संर्क साधून आपला कोटाअंतर्गत प्रवेश निश्चित करु शकतात.

संबंधित विद्यालयाला समक्ष भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करता येईल. (वेळापत्रकानुसार)

22 जून 2023 रात्री 8 पर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाईन नोंदवण्यासाठी उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी वेळ (रात्री 8 पर्यंत)

उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी कोट्यातील रिक्त जागा CAP कडे समर्पित करण्याची वेळ

23 जून 2023 कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर कोटानिहाय रिक्त जागा जाहीर करणे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur Loksabha Election 2024: कोण होणार शिरूरचा खासदार?, अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

Sujay Vikhe Ahmednagar | सुजय विंखेंचं पावसात भाषण!

Today's Marathi News Live : नवनीत राणांच्या मेळाव्याला बोलवून पैसे न दिल्यामुळे महिलांचा गोंधळ

Mother's Day Gift: मदर्स डेला तुमच्या आईला द्या गिफ्ट; कमी किंमतींचे खास गिफ्ट

Dhananjay Munde Speech Beed | पुष्पा पिक्चर! धनंजय मुंडे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT