11th admission, pune, ssc result, fyjc online admission Saam Tv
मुंबई/पुणे

Mission Admission : अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीचा आज शेवटचा दिवस; जाणून घ्या नवे वेळापत्रक

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune News : अकरावीच्या प्रवेशाच्या (fyjc admission) पहिल्या फेरीसाठी १४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया अंतर्गत तीन लाखाहून अधिक अर्ज प्रमाणित न केलेले आल्याने प्रशासनाकडून मुदत वाढीचा निर्णय घेण्यात आला. (Maharashtra News)

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे दिसून आले आहे. तसेच काही विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज प्रमाणित होणे बाकी आहे. विद्यार्थ्यांना ८ जूनपासून 12 जूनपर्यंत अर्जाचा भाग दोन म्हणजे महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरायाचे हाेते. अनेक विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन अद्याप भरलेला नाही नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आजपर्यंत (ता. 14 जून) मुदत वाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १४ जून रोजी दहावीच्या गुणपत्रिकांचे वितरण हाेणार आहे.

नव्या निर्णयानूसार ११ वी प्रवेशाचे वेळापत्रक

- विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरणे सुरू राहील : १४ जून सायंकाळी पाच वाजेपर्यंत

- मार्गदर्शन केंद्रांनी अर्जाचा भाग एक प्रमाणित करणे : १४ जून रात्री १० वाजेपर्यंत

- भाग एक भरलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे : १५ जून सकाळी १० वाजेपर्यंत

- सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे व दुरुस्ती करणे : १५ ते १७ जून

- पसंतीक्रम अर्जाचा भाग दोन भरणे : १७ जूनपर्यंत

- पहिल्या नियमित फेरीसाठी अलॉटमेंट जाहीर करणे :२१ जून

- पात्र विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करणे : २१ ते २४ जून

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT