snake bite Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai News: अवघ्या 2 रुपयांसाठी मुलाने गमावला जीव; बिळातले पैसे काढायला गेला, अन् सापाने केला दंश

Latest News: मानवच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Priya More

Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) 11 वर्षांच्या मुलाचा साप चावल्यामुळे (snake bite) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतल्या तुर्भे एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे. काही तरी चावले असल्यामुळे या मुलाने दुर्लक्ष केले आणि यामध्येच त्याचा मृत्यू झाला. मानव दीपक गावडे असं या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. मानवच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावामध्ये ही घटना घडली आहे. या गावामध्ये मानव गावडे आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. शाळांना सुट्टी लागल्यामुळे मानव आपल्या काही मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता मानवकडे असणारे दोन रुपये एका बिळात पडले. हे पैसे काढण्यासाठी त्याने बिळामध्ये हात घातला. त्याचवेळी दगडाच्या भिंतीत लपलेल्या सापाने त्याला दंश केला.

साप चावल्यानंतर मानव तसाच खेळत राहिला. खेळण्याच्या नादामध्ये त्याने कोणालाच काही सांगितले नाही. पण संध्याकाळी त्याला अस्वस्त वाटू लागले त्यामुळे तो घरी गेला. घरी आल्यानंतर त्याने आपल्या आईला कसं तरी होत असल्याचे सांगितले. तर त्याच्या आईने विचारणा केल्यानंतर त्याने हाताला काही तरी चावले असल्याचे सांगितले. मानवची तब्येत खूपच बिघडत चालल्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

मानवला वाशीतील मनपा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण तोपर्यंत खूपच उशिर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषीत केले. मानवच्या मृत्युमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे तुर्भे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशामध्ये शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी आणि त्यांच्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Shani Yuti: दिवाळीपूर्वी शनी-शुक्र बनवणार दुर्मिळ संयोग; करियर आणि बिझनेसमध्ये होणार लाभ

Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

Bhandup Railway Station : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल; नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT