10th SSC Result Saam Tv
मुंबई/पुणे

10th SSC Result: दहावीचा निकाल कुठे अन् कसा पाहाल? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

10th SSC Result Date And Process: दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. दहावीचा निकाल तुम्ही कुठे अन् कसा पाहाल ते जाणून घ्या.

Siddhi Hande

बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. १५ मेपर्यंत दहावीचा निकाल लागणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. बारावीच्या निकालानंतर आता आठवड्याभरातच दहावीचा निकाल लागणार आहे. निकालाचा दिवस जसाजसा जवळ येत तसतशी विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

दहावीचा निकाल कुठे अन् कसा पाहावा? (SSC Result Process)

दहावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर पाहू शकतात. यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड वेबसाइट जारी करते. तुम्ही खाली दिलेल्या वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात.

mahahsscboard.in

mahresult.nic.in

msbshse.co.in

mh-ssc.ac.in

sscboardpune.in या काही वेबसाइट आहेत.

दहावीचा निकाल लागेल त्या दिवशी या वेबसाइटवर जाऊन तुम्ही रिझल्ट पाहू शकतात. यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट ओपन होईल.

डिजीलॉकरवरुन डाउनलोड करा निकाल (How to Download SSC Result)

तुम्ही डिजिलॉकर या वेबसाइट किंवा अॅपवर जाऊनदेखील रिझल्ट डाउनलोड करु शकतात.

सर्वात आधी तुम्हाला डिजिलॉकरवर जाऊन अपार आयडी लॉग इन करायचा आहे.

यानंतर SSC Result असं टाइप करायचं आहे.

यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकायचा आहे.

सीट नंबरनंतर काही आवश्यक माहिती भरायची आहे.यानंतर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

दहावीचा हा निकाल तुम्ही डाउनलोडदेखील करु शकतात.

दहावीचा निकाल

दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे आहे. दहावीची परीक्षा मार्च महिन्यात झाली. त्यानंतर निकाल कधी लागणार असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडला आहे. दहावीनंतर करिअरच्या अनेक संधी विद्यार्थ्यांसमोर असतात. कला, वाणिज्य की विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा हे विद्यार्थ्यांना ठरवायचे असते. याचसोबत डिप्लोमाचादेखील पर्याय असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी अपडेट; मकर संक्रांतीच्या दिवशी ३००० रुपये होणार बँक खात्यात जमा? महत्वाची माहिती समोर

आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा, अनेक सरकारी कार्यालयं आंदोलकांच्या ताब्यात

प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! लोकल रेल्वेच्या वाहतूक वेळेत बदल; या मार्गांवर असणार मेगा ब्लॉक

National Flower Lotus: फक्त भारत नाही 'या' देशांचही आहे कमळ राष्ट्रीय फूल

Maharashtra Live News Update: अखेर अकोट नगरपालिकेत एमआयएमच्या 5 नगरसेवकांचा स्वतंत्र गट

SCROLL FOR NEXT