Thane Ganeshotsav 2022 विकास काटे
मुंबई/पुणे

Thane Ganeshotsav 2022: ठाण्यात दीड दिवसांच्या गणपती विसर्जनात १० टन निर्माल्‍य संकलित

Thane Latest News : ठाण्यातील समर्थ भारत व्‍यासपीठ आणि ठाणे महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍याचे संकलन करण्यात आले आहे.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

ठाणे: राज्यासह देशभरात गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) जोरदार उत्साहाने साजरा केला जातोय. काल, गुरुवारी दिड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. ठाण्यातही दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. या दीड दिवसांत सुमारे १० टन निर्माल्य जमा करण्यात आले आहे. ठाण्यातील (Thane) समर्थ भारत व्‍यासपीठ आणि ठाणे महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍याचे संकलन करण्यात आले आहे. आता या १० टन निर्माल्याची त्‍याची शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लावण्यात येणार आहे. या अभियानाचे यंदा १२ वे वर्ष आहे. केवळ दीड दिवसाच्‍या गणपती विसर्जनात जवळपास १० टन निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे. (Thane Ganeshotsav 2022)

हे देखील पाहा -

कृत्रिम तलावाचा प्रयोग ठाण्‍याने महाराष्‍ट्राला दिला. त्‍याचसोबत तलावांचे शहर असलेल्‍या ठाण्‍याने गणपती काळातील निर्माल्‍य व्‍यवस्‍थापनासाठी देखील गेल्‍या १२ वर्षांपासून महानिर्माल्‍य व्‍यवस्‍थापन अभियान राबविले आहे. शहरातील जवळपास ७ विसर्जन घाटावर दरवर्षी सफाई सेवक आणि कार्यकर्त्‍यांच्‍या माध्‍यमातून गणेश भक्‍तांकडून निर्माल्‍य आणि सजावटीचे साहित्‍य संकलित केले जाते. विसर्जन घाटावर तैनात करण्‍यात आलेल्‍या वाहनांमध्‍ये या निर्माल्‍याचे जैविक आणि अजैविक असे वर्गीकरण केले जाते. वर्गिकृत कचरा समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या संयुक्‍त कचरा व्‍यवस्‍थापनावर पाठवला जातो. जैविक कचऱ्यातून खत निर्मिती केली जाते, तर अजैविक कचऱ्यात असलेल्‍या प्‍लास्‍टिक, कागद, पुठ्ठा, काच, कागद सारखे घटकदेखील संस्‍थेच्‍या प्रकल्‍प पुर्ननिर्माणमध्‍ये शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाटीसाठी पाठवले जातात.

गेल्‍या १२ वर्षापासून समर्थ भारत व्‍यासपीठ हा उपक्रम राबवित आहे. शहरातील सफाई सेवक महिला आणि संस्‍थेचे कार्यकर्ते गणेशोत्‍सव अधिक पर्यावरणपुरक व्‍हावा यासाठी जनजागृती करत असतांनाच प्रत्‍यक्ष निर्माल्‍य संकलन आणि त्‍याची शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लागावी म्‍हणून एक महिना या महानिर्माल्‍य अभियानात कार्यरत असतात. दीड दिवसाच्‍या विसर्जनात जवळपास १० टन निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: सिंहगड उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडणार, पुण्यातील वाहतूक कोंडी वाढणार; नेमका फटका कुणाला बसणार?

Maharashtra Live News Update: शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व हरपले- अजित पवार

धक्कादायक!'२१ वर्षांपर्यंत थांब' म्हणताच १९ वर्षीय प्रियकराने संपवलं आयुष्य, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

Jay Pawar Wedding: अजितदादांच्या घरी लगीनघाई! लेक जय पवारांचं लग्न परदेशात होणार; कसा असणार विवाहसोहळा? पत्रिका पाहा

Rapper Death: प्रसिद्ध रॅपरचे निधन, वयाच्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीत विश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT