जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरातील बालाजी प्लाॅट मधील एका २१ वर्षीय युवकाच्या घरी शस्त्रसाठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे Saam TV
मुख्य बातम्या

योगपटू तरुणाच्या घरी आढळला शस्त्रसाठा

जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरातील बालाजी प्लाॅट मधील एका २१ वर्षीय युवकाच्या घरी शस्त्रसाठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे

अरूण जोशी

अमरावती : जिल्ह्यातील अंजनगाव Anjangaon सुर्जी शहरातील बालाजी प्लाॅट मधील एका २१ वर्षीय युवकाच्या घरी शस्त्रसाठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास टाकलेल्या धाडीमध्ये पोलिसांनी Police चेतन चंदू चंदनपत्री रा. बालाजी प्लॉट, अंजनगाव सुर्जी याच्या घरातून ५ तलवारी Swords, ८ जांबीये व २ कट्यार जप्त करीत त्याला ताब्यात घेतले. Weapons found in Amravati at Yoga Expert

विशेष म्हणजे आरोपी चेतन हा अमरावती Amravati विद्यापीठाचा योगा Yoga या क्रीडा प्रकारातील कलरकोट धारक असून त्याने अनेक योगा स्पर्धा गाजवल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच आॅनलाइन आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले होते.

दोन दिवसांपूर्वी विक्की वानखडे नामक युवकाने एका कँटीनमध्ये तलवार हातात घेऊन बसलेला फोटो समाज माध्यमावर अपलोड केला. ही तलवार अजय अशोक आसलकर काठीपुरा, अंजनगाव याची होती. फोटो समाज माध्यमावर अपलोड होताच पीएसआय सपकाळ यांनी शोध घेतला असता, विक्की वानखडे याच्या जवळून गजानन हुरपडे व श्रीकांत नाथे यांच्या समक्ष नवीन बस स्टॅन्ड परिसरातून १ जवार व विक्कीने दिलेल्या माहितीवरून चेतन चंदनपत्री याच्या घराची झडती घेतली असता, चार तलवारी व दहा निरनिराळे चाकू आढळून आले.

पोलिसांनी तिघांवरही गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या बयाणावरून चेतन ही शस्रे आॅनलाइन विकत घेत होता आणि त्याची विक्री गावात करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सपकाळ, पीएसआय मंजूषा ढोले, पीएसआय इम्रान इनामदार, चालक भूषण तयावाडे आदींनी केली.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT