ईगतपुरी येथे पोलिसांनी छापा मारलेल्या हायप्रोफाइल रेव्ह पार्टीच्या ठिकाणी पोलिसांना कोकेन आढळून आले आहे - Ahhijeet Sonawane
मुख्य बातम्या

Breaking ईगतपुरीच्या रेव्ह पार्टीत पोलिसांना आढळले कोकेन

ईगतपुरी येथे पोलिसांनी छापा मारलेल्या हायप्रोफाइल रेव्ह पार्टीच्या ठिकाणी पोलिसांना कोकेन आढळून आले आहे

अभिजित सोनावणे

नाशिक : ईगतपुरी येथे पोलिसांनी छापा मारलेल्या हायप्रोफाइल रेव्ह पार्टीच्या ठिकाणी पोलिसांना कोकेन आढळून आले आहे. पार्टीच्या ठिकाणाहून कोकेनसह मोठ्या प्रमाणात ड्रग्स, मद्य आणि हुक्का पोलिसांनी जप्त केला असून उपस्थित 22 जणांवर अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ईगतपुरीमध्ये एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा टाकून नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही हायप्रोफाईल रेव्ह पार्टी उधळून लावली. धक्कादायक बाब म्हणजे या रेव्ह पार्टीत मराठी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्रींचा समावेश असून दोन कोरियोग्राफर आणि 'बिग बॉस' फेम स्पर्धकही या रेव्ह पार्टीत सहभागी असल्यानं खळबळ उडाली आहे.

सध्या संपूर्ण देश आणि राज्य कोरोनाच्या संकटातून जातो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध असतांनाही नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरीमध्ये मात्र हायप्रोफाईल रेव्ह पार्टी सुरु होती. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ती उधळून लावली. ईगतपुरीच्या 'स्काय ताज व्हिला' या बंगल्यामध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त महितीनंतर पोलिसांनी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान या ठिकाणी छापा टाकला तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला.

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्रींसह बिग बॉस फेम अभिनेत्री, दोन कोरियोग्राफर आणि एका परदेशी महिलेसह एकूण २२ जण या ठिकाणी ड्रग्स आणि हुक्का सेवन करतांना बीभत्स अवस्थेत आढळले. त्यामुळे पोलिसांनी २२ जणांना अटक केली असून अटक केलेल्यांमध्ये १० पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळहून कॅमेरा, ट्रायपॉडसह मादक द्रव्य जप्त केली आहेत.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT