narayan rane 
मुख्य बातम्या

राणेंचा प्रहार; आज ना उद्या मी खणखणीत वाजवणार

सुमीत सावंत, अमोल कलये

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज माझा आवाज बसला आहे. आवाज खणखणीत झाल्यानंतर खणखणीत वाजवणार असे उच्चारताच रत्नागिरीत समर्थकांनी एकच जल्लाेष केला. चुकुनही वाटेला जाऊ नका तुम्ही आम्हांला अनुभवलं आहे असा सूचक इशारा काेणाचे ही नाव न घेता राणेंनी narayan rane विराेधकांना दिला आहे. ते जन आशीर्वाद यात्रेत उपस्थितांशी बाेलत हाेते.

रत्नागिरी येथे आज राणेंची जन आशीर्वाद यात्रा सुरु झाली. त्यांनी उद्याेजक आनंद देसाई यांच्या आंबा प्रकल्पास भेट दिली. तेथे त्यांनी उद्याेजकांना, बागायतदारांना आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी यात्रा सुरु ठेवली. एका ठिकाणी त्यांनी सभागृहात उपस्थितांशी संवाद साधत कार्यकर्त्यांना भाजपची काेकणात ताकद वाढविण्यासाठी जिद्द बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी राणेंनी सेनेवर नाव न घेतला हल्लाबाेल केला.

राणे म्हणाले अटक करुन काय पराक्रम केला? विकासात्मक, विधायककामे आम्हांला करायची आहेत. आम्हांला घरात बसून काम नाही करायचे आणि घरात बसून हे असं झालं तसं झालं हे पण सांगायचे नाही. काही केलेच नाही म्हटल्यावर काय सांगणार असा टाेमणा राणेंनी मारला. यावेळी धमक्या राणेंना देऊ नका, माझ्याकडे पुष्कळ मसाला आहे असेही नमूद केले.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राणे म्हणाले सगळेचे सगळे माजी आमदार, खासदार हे आगामी काळात आजी आजी व्हायला पाहिजेत यासाठी सर्वांनी जिद्दीने काम करायचे आहे. शिवसेना आैषधला कूठे शाेधून मिळू नये याची काळजी घ्या.

काेकणतातून भाजपचे आमदार आणि खासदार पाठविणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. तशी जिद्द बाळगा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी हे भारत देशाचे नाव जगात अग्रभागी राहावे यासाठी सातत्याने ते प्रयत्न करीत आहेत. आपले सरंक्षण, अन्न धान्य समृद्ध असावे, युवकांना राेजगार उपलब्ध व्हावेत यासाठी ते परिश्रम घेताहेत असे राणेंनी नमूद केले.

आपल्या भाषणात राणेंनी नुकत्याच घडलेल्या घटनांवर भाष्य केले. ते म्हणाले आमच्या घरासमाेर वरुण देसाई हल्ला करताे त्याला अटक नाही. आता परत आला तर परत जाणार नाही. आमच्या घरावर काेणीही येईल आम्ही नाही साेडणार असे म्हणत ताे वरुण येऊदेच असा इशारा राणेंनी सरदेसाईंना दिला.

दरम्यान टप्प्याटप्याने मी सगळं बाहेर काढणार आहे. सगळी प्रकरणं बाहेर काढीन. तुम्हांला जाे कायदा ताे आम्हांला आहे. दादागिरी करु नका ताे तुमचा पिंड नाही. तुम्ही अनुभवले आहे आम्हांला जवळून पाहिले आहे वाटं जाऊ नका. माझा आवाज बसला आहे. आज ना उद्या ताे ठीक हाेईल. आवाज खणखणीत झाल्यानंतर मी खणखणीत वाजवणार असे राणेंनी उच्चारताच समर्थकांनी जल्लाेष केला. या कार्यक्रमानंतर राणे आपल्या पुढील दाै-यासाठी निघून गेले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संतापजनक! गोड बोलून फ्लॅटमध्ये नेलं अन्...; वाढदिवसाच्या रात्री महिलेसोबत घडलं भयंकर

Beed News: बीडमध्ये दोन गट आमने-सामने; एका गटाकडून वाल्मिक कराडच्या नावाने घोषणाबाजी|VIDEO

Beed News : बीडमध्ये पोलीस अॅक्शन मोडमध्ये; बीडमधील नागरिकांना केलं मोठं आवाहन

Rava Masala Puri Recipe : गरमागरम चहा अन् रवा-मसाला पुरी, पावसात करा चटपटीत नाश्ता

Avneet Kaur: अवनीत कौरचा 'बोले चूड़ियां' लूक तुम्ही खास सोहळ्यासाठी करु शकता कॉपी

SCROLL FOR NEXT