नांदेडमध्ये काॅंग्रेसचे आंदोलन
नांदेडमध्ये काॅंग्रेसचे आंदोलन 
मुख्य बातम्या

नांदेडमध्ये काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा; अशोक चव्हाणांची केंद्रसरकार टिका

संतोष जोशी

नांदेड : नांदेडमध्ये काँग्रेसने इंधनदरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा गुरुवारी (ता. १५) काढला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. याच मोर्चा दरम्यान, माजी महापौर अब्दुल सत्तार बसलेला सायकल रिक्षा उलटला, त्यात काहींजण किरकोळ जखमी झाले. या घटनेची चांगलीच चर्चा शहरात रंगली होती. या मोर्चात हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश असताना हजारोंची गर्दी मोर्चात होती. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा काँग्रेस कार्यकर्त्याना विसर पडलेला दिसला. यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. Congress- bullock cart -march -in -Nanded-Ashok- Chavan -criticizes- the- central- government

केंद्र सरकारच्या धोरणामुळे महागाई वाढत असून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ढासळत असून देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्नात निच्चांक पातळी गाठली आहे. इंधन दरवाढ नियंत्रित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात न आल्याने इंधन दरात सातत्याने वाढ सुरुच आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शतक पूर्ण करत सर्वोच्च पातळी गाठली आहे. दिवसागणिक इंधन दरवाढ होत असून त्याचबरोबर महागाईत वाढ होत आहे. लॉकडाउनच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होत असतांना देखील भारतात इंधनाचे दर वाढत आहेत असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

हेही वाचा - शैक्षणिक शुल्कनिश्चितीसाठी समिती हा निव्वळ वेळकाढूपणा असून शिक्षणसंस्थांच्या मनमानी फी आकारणीस चाप लावण्यात शासन सपशेल अपयशी ठरले

इंधन दरवाढ व महागाई विरोधात जनतेचा आवाज मोदी सरकारच्या कानावर पडावा व केंद्र शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी राज्यभर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत असून गुरुवारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात बैलगाडी व सायकल मोर्चा काढण्यात आला. मोर्चात आमदार अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहन हंबर्डे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, माजी आमदार हनमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंडेकर, शहर जिल्हाध्यक्ष डाॅ. विठ्ठल पावडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कविता कळसकर, शहराध्यक्षा अनुजा तेहरा, ब्लाॅक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर स्वामी, विनोद कांचनगिरे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अब्दुल गफार, सत्यजित भोसले यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime : सोशल मिडियावर ओळख; लग्नाचे आमिष देत विवाहितेवर अत्याचार

Today's Marathi News Live : अजिंठा घाटात बस पलटी, सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

Priyanka Gandhi: राहुल गांधी पुन्हा 2 जागांवर निवडणुकीच्या रिंगणात, प्रियंका गांधींसाठी काँग्रेसचा प्लॅन काय? बड्या नेत्याने दिली माहिती

Amruta Kulkarni: अमृताचे गाजलेले चित्रपट माहितीये आहेत का?

Jalgaon News : शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

SCROLL FOR NEXT