नाशिक : आरटीओ RTO भ्रष्टाचार Corruption आणि अनागोंदी प्रकरण हे चौकशी अंती फुसका बार ठरल्याचे समोर आले आहे. या तक्रारीच्या चौकशीत परिवहन मंत्री अनिल परब Anil Parab यांच्यासह अन्य आरटीओ अधिकाऱ्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. Clean Chit to Anil Parab in RTO Transfer Scam
आरटीओ बदली प्रकरणात 300 कोटींचा अपहार झाल्याची तक्रार निलंबित आरटीओ अधिकारी गजेंद्र पाटील यांनी केल्यावर खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणाची पोलीस Police चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर तक्रारीत तथ्य नसल्याचं समोर आल्याचं स्पष्टीकरण पोलिस आयुक्तांनी दिलं आहे.
हे देखिल पहा
आरटीओ बदली प्रकरणात 300 कोटींचा अपहार झाल्याची तक्रार निलंबित आरटीओ अधिकारी गजेंद्र पाटील यांनी केली होती. या तक्रारीत आरटीओ अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अपहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्यानं खळबळ उडाली होती. पोलिसांनी आरटीओच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली.
या चौकशीनंतर गुन्हा झाल्याचं चौकशीत निष्पन्न होत नसल्याचा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी सादर केला असून परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनाही क्लीन चीट देण्यात आलीय. तर या प्रकरणी तक्रारदाराची उलट चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येते आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.