अण्णा हजारे पुन्हा लागले अजित पवारांच्या मागे - Saam Tv
मुख्य बातम्या

अण्णा हजारे पुन्हा लागले अजित पवारांच्या मागे

सातारा येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याप्रकरणी ईडीने कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता लक्ष घातलं आहे

साम टिव्ही

नगर : सातारा येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याप्रकरणी ईडीने कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता लक्ष घातलं आहे. केवळ जरंडेश्वरच नाही तर सहकारातील ४९ कारखान्यांमध्ये गफला झाला आहे. राज्यात सहकाराचे खासगीकरणे करणारी टोळी आहे. ईडीने चौकशी केली तर सगळं बाहेर येईल, असा घणाघातही अण्णांनी केला आहे.

हजारे म्हणाले, ''जरंडेश्वरची सर्व कागदपत्र माझ्याकडे आहेत. आम्ही उच्च न्यायालयात ती दाखल केली आहेत. मात्र, न्यायालयाने सांगितले की तुमची तक्रार दाखल पाहिजे. त्यानंतर आम्ही मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलिस स्टेशन इथं चार हजार पानांची तक्रार दाखल केली. कारखान्याची तक्रार नोंदवल्यानंतर सरकारने मात्र चौकशी करण्यासाठी त्यांच्या मर्जीतील माणसाला नियुक्त केले. त्यांनी या प्रकरणात काही तथ्य नाही असा अहवाल सरकारला दिला. आम्ही पुन्हा आता सत्र न्यायालयात गेलो. तिथं ही केस सुरू आहे. तिथून आता एक चांगली गोष्ट झाली की ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. आता ईडीने फक्त जरांडेश्वर कारखान्याची नाही तर उरलेल्या ४९ साखर कारखान्याची चौकशी करावी,''

''सर्व कारखान्यात अशाच प्रकारचे गैरव्यवहार झालेत त्याचे गबाळ चौकशीअंती बाहेर पडेल. त्यांचीही चौकशी ईडीने करावी. ४९ कारखाने कवडीमोल भावाने विकले. संगमताने सर्व कारखाने कुणाला कोणता कारखाना द्यायचे असे सर्व नियोजन करून विकण्यात आले. आता आमची विनंती एकच आहे. ईडीने या सर्व ४८ कारखान्याची चौकशी करावी. आम्हाला कुठल्याही पक्ष व पार्टीचे घेणं देणं नाही. राज्यातील सहकाराचा आदर्श इतर राज्यांनी घेतला होता. बॅ. धनंजय गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रयत्न करून राज्यात सहकार चळवळ वाढविण्यासाठी मोठं काम केलं. राज्यात सहकार चळवळ मोडण्याचे काम सुरु आहे, याचे मला दुःख वाटते,'' असेही अण्णा म्हणाले.

''आता ह्या राज्यात ही सहकार चळवळ मोडीत काढून खाजगीकरणाच्या मागे लागलेत. हा खूप मोठा धोका आहे. यामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागले आहेत. यात ईडीने लक्ष घातल्यामुळे आता हे प्रकरण बाहेर पडेल. महाराष्ट्र राज्याच्या शिखर बँकेची चौकशी एक दोनदा नाही तर तेरा ते चौदा वेळा चौकशी झाली. बँकेच्या ८८ संचालक यांच्याकडून वसुली निश्चित केली. पण सत्ता हातात असल्यावर काय होत ते आपण पहातच आहोत. आमच्यासारखं लोकं हाय कोर्टात, सत्र न्यायालयात गेले तेंव्हा शिखर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले, असेही अण्णा म्हणाले.

''अजित पवारांचं नाव आम्ही आधीच घेतलं होतं. ह्या सगळ्या ४९ कारखान्यातील घोटाळा लोकांच्या समोर ईडीच्या चौकशी नंतर समोर येईलच.अजित पवारांचे नाव येतंय, हे आम्ही कधीपासून बोलतोय पण फकीर माणसाचे कोण ऐकतंय. आता ईडीने लक्ष घातल्यामुळे सर्वकाही बाहेर पडेल, याचा आम्हाला विश्वास वाटतोय,'' असेही अण्णा हजारे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Water Benefits: लसणाचे पाणी ठरेल केस गळतीवर रामबाण उपाय

Vinod Tawde: विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई; पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

Solkadhi Recipe: सोलकढी कशी बनवावी? संपूर्ण रेसिपी सोबत फायदे आणि टिप्स

Maharashtra Political News : बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का; अधिकृत उमेदवाराचा मतदानाआधीच भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra News Live Updates: डहाणूमध्ये बविआला मोठा धक्का, उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT