yashomati thakur 
मुख्य बातम्या

यशाेमती ठाकूरांनी मारलं मैदान; बच्चू कडूंचा सहकारात प्रवेश

अरुण जोशी

या निवडणुकीत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे सहकार पॅनल बाजी मारते की राज्यमंत्री बच्चू कडू यांचे परिवर्तन पॅनल बाजी मारणार याची उत्सुकता राज्यात लागून राहिली हाेती.

अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी सहकार पॅनलने विराेधी परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवित बॅंकेवरील सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीत सहकार पॅनेलचे १२, परिवर्तन पॅनलचे चार तसेच एक अपक्ष उमेदवार निवडून आले. यापुर्वी चार जण बॅंकेच्या संचालकपदी बिनविराेध निवडून आले आहेत. amravati-district-cooperative-bank-election-final-result-yashomati-thakur-wins-bacchu-kadu-latest-news-sml80

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी १७ जागांसाठी सोमवारी मतदान झाले. आज (मंगळवार) सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यातच सहकार पॅनलचे एकेक उमेदवार विजय मिळवू लागल्याने यशाेमती ठाकूर यांच्या गाेटात उत्साहाचे वातावरण हाेते. त्यानंतर परिवर्तन पॅनलचे उमेदवार बच्चू कडू यांनी सहकार पॅनलच्या बबलू देशमुख यांचा पराभव केल्याने सहकार पॅनलचे समर्थकांत शांतता पसरली. एकेक निकाल हाती येऊ लागताच त्या गटाचे सर्मथक जल्लाेष करीत हाेते.

या निवडणुकीत राज्याचे दोन मंत्री एकमेकांसमोर उभे ठाकल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचे सहकार पॅनल आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे परिवर्तन पॅनल या दोन प्रमुख पॅनलमध्ये ही निवडणूक रंगली.

अपेक्षेप्रमाणे सहकार पॅनलने १५ विरुद्ध ०५ असा परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडिवला. परिवर्तन पॅनलमधून निवडणूक लढविणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या समवेत अन्य चाैघांनी बॅंकेत प्रवेश केला आहे. दरम्यान या मतमाेजणीनंतर जल्लाेष करण्याच्या कारणावरुन पाेलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार

सुनील वऱ्हाडे (अमरावती)

वीरेंद्र जगताप (चांदूर रेलवे)

हरिभाऊ मोहोड (भातकुली)

दयाराम काळे (चिखलदरा)

श्रीकांत गावंडे (धामनगाव रेल्वे)

सुधाकर भारसाकळे (दर्यापुर)

प्रकाश काळबांडे (क २ पतसंस्था मतदारसंघ)

बलवंत वानखड़े (एससी/एसटी मतदारसंघ)

बबलू देशमुख (ईतर मागास वर्ग मतदारसंघ)

बालासाहेब अलोने (ब ४ विमुक्त जाती मतदारसंघ)

सुरेखाताई ठाकरे (महिला मतदारसंघ)

मोनिका मार्डीकर (महिला मतदारसंघ)

परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार

बच्चू कडू (चांदूर बाजार)

अजय मेहकरे (अंजनगाव सुर्ज़ी)

चित्रा डहाणे (मोर्शी)

रविन्द्र गायगोले (क1 - वैयक्तिक भागधारक मतदारसंघ)

अपक्ष विजयी उमेदवार

आनंद काळे (अचलपुर)

बिनविरोध

नरेशचंद्र ठाकरे (वरुड)

अभिजीत ढेपे (नांदगांव खंडेश्वर)

श्री साबळे (तिवसा)

जयप्रकाश पटेल (धारणी)

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT