फिरायला जाणाऱ्यांना १५ दिवस क्वारंटाईन करणार - अजित पवार

 

Saam Tv

मुख्य बातम्या

फिरायला जाणाऱ्यांना १५ दिवस क्वारंटाईन करणार - अजित पवार 

अजित पवार यांनी आज पुण्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - अजित पवार Ajit Pawar यांनी आज पुण्यातील Pune अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाचा Corona उद्रेक पाहता पुण्यात वीकेंड लॉकडाऊन Lockdown लागू करण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरु राहणार आहे. शनिवारी आणि रविवारी पुण्यात वीकेंड लॉकडाऊन असेल परिस्थिती सुधारली तर विचार करुअशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. ajit pawar on weekend lockdown in pune

 ग्रामीण भागातही हे नियम लागू राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व काही शनिवारी आणि रविवारी बंद राहणार आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी नियोजन सुरू आहे. कोरोनाचे प्रमाण जरी कमी असले तरी विदेशात आलेली तिसरी लाट पाहून खबरदारी म्हणून आतापासून नियोजन सुरु करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

काही जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन शिथिल करताच वीकेंडला पुणेकर पर्यटनस्थळी प्रचंड गर्दी करत आहेत त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले. अनेक लोक अजूनही कोरोनाला गांभीर्याने घेत नाही. कारण नसताना लोक घराबाहेर पडत आहेत. अत्यंत महत्त्वाची कामी असतील तरच बाहेर जा. काही लोकं तर पुण्याच्या बाहेर जात आहेत. ajit pawar on weekend lockdown in pune

पुण्याच्या बाहेर जाणाऱ्या लोकांना पुण्यात आल्यावर 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन केलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.तसेच तिसऱ्या लाटेबाबत पालकांना घाबरवायचं नाही, मात्र काळजी घ्यावी  असेही ते म्हणले. अमेरिकेत शंभर टक्के लसीकरण झालेले असतानाही तिथे तिसरी लाट आली आहे आपल्याकडे अजून लसीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे  खबरदारी घेणे हे आमचे काम आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भात तापमान ४५ पेक्षा जास्त

IPL 2026 मधील सर्वात जबरदस्त सामना; अवघ्या ३९ चेंडूंत RCBने मिळवला विजय,पॉईंट्स टेबल बेंगरुळुची भरारी

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

SCROLL FOR NEXT