Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

ZP Election Result: झेडपीचा पहिला कल अजितदादांच्या बाजूने, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पहिल्या तासातच विजय

ZP Election Result Maharashtra : झेडपी निवडणूक निकालात पहिल्याच तासात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यात अश्विनी दळवे यांचा विजय झाला असून भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार लढत पाहायला मिळत आहे.

Namdeo Kumbhar

ZP election first trend favors Ajit Pawar NCP : अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यात पहिलीच निवडणूक होत आहे. १२ जिल्हा परिषदेसाठी ७ तारखेला मतदान पार पडले होते. आज सकाळी १० वाजलेपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर राज्यातील पहिला कल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने लागला आहे. सोलापूरमधील माढा तालुक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवलाय. सोलापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. (ZP Election Results 2026: First Trend Favors Ajit Pawar as NCP Candidate Wins Within an Hour)

अश्विनी दळवी विजयी Ashwini Dalve wins ZP election Madha

सोलापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खाते उघडले. माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी दळवे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवराचा पराभव केला. भोसरी गटात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार लढत झाली. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सहज विजय मिळवला. (ZP Election Result Maharashtra)

सोलापूरमध्ये काय स्थिती?

महूद गटाचे शिवसेनेचे उमेदवार दादासो लवटे व गणाचे गणाचे शिवसेनेचे बाळासाहेब मच्छिंद्र बंडगर व महूद गणाचे शिवसेनेचे सोनाली पाटील विजयी झाले आहेत. तर करमाळा जिल्हा परिषद पांडे गटातून भाजपच्या नेत्या रश्मी बागल पिछाडीवर आहेत. तर शरद पवार गटाचे उमेदवार राणी संतोष वारे आघाडीवर आहेत. करकंब गटातून भाजपाचे आदिनाथ देशमुख ७०० मतांनी आघाडीवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT