Election Commission of Maharashtra announces Zilla Parishad and Panchayat Samiti election schedule. Saam Tv
महाराष्ट्र

जिल्हा परिषद, पंचायत समितीचा शंखनाद! कधी आणि कोणती निवडणूक होणार? जाणून घ्या A टू Z माहिती|VIDEO

Maharashtra ZP And Panchayat Samiti Election: महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा शंखनाद झाला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान, दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका का लांबल्या, आरक्षणाचा गुंता आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Omkar Sonawane

पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीची आज घोषणा करण्यात आली. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी असेल. राज्यात आणखी २० जिल्हा परिषदा आणि उर्वरित पंचायत समितीच्या निवडणुका दुसर्‍या टप्प्यात पार पडणार आहेत. पण दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका कधी लागणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका का लांबल्या ?

५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे प्रकरण कोर्टात गेले होते. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळेच २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबल्या आहेक. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदा विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वाधिक आहेत. या झेडपीमधील आरक्षणाचा गुंता सुटल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाहीत, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होणार ?

२० जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत. त्यातच १० आणि १२वीच्या परिक्षा होणार आहेत. त्याशिवाय शाळेमधील वार्षिक परीक्षाही होणार आहेत. त्यामुळे २० जिल्हा परिषदेच्या या निवडणुका मे अथवा जूनपर्यंत लांबणीवर पडल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीतच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.

कोणत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात

नंदुरबार - १०० टक्के

पालघर - ९३ टक्के

गडचिरोली- ७८ टक्के

नाशिक- ७१ टक्के

धुळे - ७३ टक्के

अमरावती - ६६ टक्के

चंद्रपूर - ६३ टक्के

यवतमाळ - ५९ टक्के

अकोला - ५८ टक्के

नागपूर - ५७ टक्के

ठाणे - ५७ टक्के

गोंदिया - ५७ टक्के

वाशिम - ५६ टक्के

नांदेड - ५६ टक्के

हिंगोली - ५४ टक्के

वर्धा - ५४ टक्के

जळगाव - ५४ टक्के

भंडारा - ५२ टक्के

लातूर - ५२ टक्के

बुलडाणा - ५२ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमा शंकर मंदिरात बंदी असतानाही खासदार निशिकांत दुबे यांनी सहपत्नीदर्शन घेतल्या प्रकरणाची चौकशी होणार

Mens Health After 40: फक्त पुरुषांनाच होतात हे ४ जीवघेणे आजार, चाळिशीतल्या पुरुषांनी आत्ताच व्हा सावध

LPG Cylinder Blast : सिलिंडरच्या भीषण स्फोटात तीन घरे उध्वस्त, दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

Summer Makeup Tips: मेकअपसाठी 3-1-1 हा नियम नक्की काय आहे? जाणून घ्या परफेक्ट मेकअपचं सिक्रेट

Chandrika Dixit Controversy: 'मुलासाठी कुणासोबत झोपावं लागलं तरी…'; बिग बॉस फेम इन्फ्लुएंसरचं धक्कादायक वक्तव्य

SCROLL FOR NEXT