Yuvraj Sambhajiraje Chhatrapati News : इंडिया शब्द बदलून भारत करणार असतील तर काही चुकीचे नाही असे मत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले. नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आणि जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (antarwali sarathi) येथील आंदाेलनाबाबत त्यांची मत मांडली. (Maharashtra News)
संभाजीराजे म्हणाले इंडिया हा शब्द फार प्राचीन काळापासून आला आहे असे काही नाही. हा शब्द ब्रिटीशांच्या कालावधीत आला आहे. भारत हा शब्द अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. भारत हे करणार असतील आणि काेणी करत आहे यापेक्षा चांगल्या गाेष्टीला आम्ही प्राधान्य देताे असे राजेंनी नमूद केले.
जालन्यातील आंदाेलनाविषयी संभाजीराजे म्हणाले मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे दरवर्षी आंदाेलन करत असतात. यावर्षी देखील ते आंदाेलनास बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला यापुर्वी देखील मी अनेक वेळा भेट दिली आहे.
त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत मराठा समाजाची जी भूमिका असेल ती माझी असेल सरकारने समितीला मी नेहमी काही सूचना केल्या आहेत. आरक्षण मिळावायचे असेल तर वेगवेगळे पॅरामीटर आहेत. ते कसे साेडवता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही राजेंनी नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक मागास नाही आहात हे सिद्ध केलेले आहे. सामाजिक मागास असल्याशिवाय तुम्हांला आरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळे आयोगाने मराठा समाजाला मागास असल्याचे ठरविणे गरजेचे असल्याचे राजेंनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.