jalna, yuvraj sambhajiraje chhatrapati, maratha reservation saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarakshan Andolan Live News : संभाजीराजेंनी घेतली मराठा आंदाेलकांची भेट, घटना सांगताना महिला ढसाढसा रडल्या

Jalna News : जालना येथे आज खासदार उदयनराजे भाेसले यांच्यासह मान्यवर मराठा आंदाेलकांची घेणार भेट.

Siddharth Latkar

- लक्ष्मण साेळूंके

Jalna Maratha Reservation : युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज (शनिवार) सकाळच्या सुमारास जालना येथील अंतरवाली सराटी (antarwali sarathi news) येथे मराठा समाज आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदाेलकांची भेट घेतली. यावेळी राजेंनी (yuvraj sambhajiraje chhatrapati latest marathi news) शुक्रवारी घडलेल्या घटनेबाबतची सविस्तर माहिती आंदाेलकांकडून घेतली. (Maharashtra News)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला जालना येथे हिंसक वळण लागल्यानंतर त्याचे पडसाद आज राज्यभरात उमटू लागले आहेत. राज्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

दरम्यान आज सकाळी अंतरवाली सराटी येथे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आंदाेलकांची भेट घेतली. पोलिसांनी महिलांना अमानुषपणे मारहाण केल्याची किफायात महिलांकडून राजेंकडे करण्यात आली. आम्ही आतंकी, किंवा पाकिस्तानी आहेत का? पायाने तुडवून पोलिसांनी आमच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आराेपही महिलांना पाेलिसांवर केला.

निजाम आणि इंग्रजांचा वारसा चालवणाऱ्या फडणवीस- शिंदे सरकारने आरक्षण मागणाऱ्या मराठ्यांवर अत्याचार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. हा हल्ला म्हणजे महाराष्ट्रातील मराठ्यांवर हल्ला असल्याचे आंदोलकांनी म्हटले. यावेळी आंदाेलकांकडून मनाेज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी देखील घटनेची माहिती राजेंना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT