Yuvraj Sambhajiraje Chhatrapati Saam Tv
महाराष्ट्र

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपतींनी ट्विट करुन व्यक्त केलीय दिलगिरी; जाणून घ्या कारण

त्याबाबतची माहिती राजेंनी ट्विट करुन दिली आहे.

Siddharth Latkar

सातारा : खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांचा उद्या (शुक्रवार, ता. ११) वाढदिवस आहे. राजेंचा वाढदिवस म्हटलं की त्यांच्यावर प्रेम करणारी देशभरातील मंडळींची काेल्हापूरात हजेरी असती. गेल्या दाेन वर्षांपासून काेराेनाचं संकट लक्षात घेता राजेंनी त्यांचा वाढदिवस साजरा केलेला नाही. यंदा देखील राजेंनी वाढदिवसा (yuvraj sambhajiraje chhatrapati birthday) निमित्त काेल्हापूर (kolhapur) शहरात हाेणारी गर्दी लक्षात घेता परगावी जाण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबतची माहिती राजेंनी ट्विट (tweet) करुन दिली आहे.

राजे (yuvraj sambhajiraje chhatrapati) लिहितात प्रतिवर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये राहण्याचा नेहमीच प्रयत्न असतो, मात्र उद्या काही कारणांस्तव कोल्हापूर येथे उपस्थित असणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लोक कोल्हापूरला येऊन माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत असतात.

छत्रपती घराण्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करीत आहे. तरी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व विश्वास माझ्या पाठीशी सदैव आहेतच, याचा मला आनंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याण-डोंबिवलीसह पाच जिल्ह्यातून हजारो भूमिपुत्र बसचा प्रवास करत दिल्लीच्या दिशेने रवाना

वन विभागाची धडक कारवाई: ५० ते ६० लाखांचा सागवान लाकडाचा साठा जप्त

महायुतीत पुन्हा खदखद! शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा तडकफडकी राजीनामा; काहीवेळातच हाती घेतलं कमळ

राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी टाकला मोठा डाव; रायगडमध्ये मनसेला भगदाड,८ प्रमुख नेत्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ति, ते वयाच्या 27 व्या वर्षी...; चंद्रकांत पाटील हे काय बोलून गेले? VIDEO

SCROLL FOR NEXT