yuvraj kumar shahaji raje chhatrapati with family saam tv
महाराष्ट्र

राजेंचे काय होणार? राजे माघार घेणार की आणखी..., सगळेच टेंशन; वाचा कुटुंबियांची भावना

युवराज शहाजीराजे हे साेलापूर दाै-यावर आले हाेते.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांना शिवसेनेने (shivsena) राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर राज्यात राजेंच्या समर्थकांनी सेनेचा निषेध नाेंदविला. आज (गुरुवार) संभाजीराजेंचे पुत्र युवराजकुमार शहाजीराजे यांनी राजेंवर प्रेम करणारे तणावात दिसत आहेत. आम्हांला सर्वांची भावना समजत आहे. जनतेच्या मनातील प्रेमच सर्व काही सांगून जात आहे असे येथे (solapur) नमूद केले. (sambhajiraje latest marathi news)

संभाजीराजे यांचे पुत्र युवराजकुमार शहाजीराजे हे साेलापूरात एका कार्यक्रमासाठी आले हाेते. त्यावेळी त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. शहाजीराजे म्हणाले सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडींमुळे विशेषत: आमच्याबाबत सुरु असलेल्या घटनांवर आमच्या आजूबाजूचे लोक टेंशनमध्ये दिसत आहेत. सर्वजण विचारताहेत राजेंचे काय होणार? राजे काय करणारेत? राजे माघार घेणार की आणखी काय? हे राजेंच्या प्रेमापाेटी सर्वांना प्रश्न पडताहेत. या सगळ्या गाेष्टींकडे तुम्ही कसे पाहता यावर शहाजीराजे म्हणाले आमच्या घरात तणावाचे वातावरण अजिबात नाहीये.

शहाजीराजे म्हणाले काल रात्री देखील मी आणि आई (संभाजीराजे यांची पत्नी) घरात काय साहित्य खरेदी करावे यावर चर्चा करत होतो. आम्ही कोणत्याही प्रकारच्या तणावात नाही. आमचे नेहमीचे काम करीत आहाेत. दरम्यान या सगळ्या घडामोडीवरुन लक्षात येतय की संभाजीराजेंबद्दल जनतेच्या मनात किती प्रेम आहे. राजकारणाचे टेंशन रोजच्या जीवनात आणणे हे मला पटत नाही. आम्ही जर खूष नसलो तर लोकांसाठी कसे काम करु असे राजेंनी नमूद केले. दरम्यान राजकीय घडामोडींबाबत शहाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांच्या काही प्रश्नांवर थेट बोलण्यास नकार दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT