युवा स्वाभिमान पक्षाचा महानगर पलिकेवर हल्लाबोल अरुण जोशी
महाराष्ट्र

युवा स्वाभिमान पक्षाचा महानगर पलिकेवर हल्लाबोल

महानगर पालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारावर शहरातील कचरा आणून टाकला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अरुण जोशी

अमरावती - महानगर पालिकेच्या क्षेत्रात सध्या सर्वीकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियाचे आजार पसरत आहे. तर डेंग्यू Dengue मुळे जिल्ह्यात आजपर्यंत अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. मात्र महानगर पालिकेने शहरात फवारणी सुरु केली असली तरी अनेक भागात अजूनही घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज महानगर पालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारावर शहरातील कचरा आणून टाकला.

हे देखील पहा -

येत्या ८ दिवसात अमरावती शहरात पूर्णपणे स्वछता न झाल्यास अधिकाऱ्यांच्या अंगावर सुद्धा कचरा टाकायला मागे पुढे बघणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी युवा स्वाभिमान पार्टीचे विद्यार्थी स्वाभिमान जिल्हा अध्यक्ष अनूप अग्रवाल, गणेश मरोडकर, स्वाभिमान हेल्प लाइनचे शहर अध्यक्ष सद्दाम हुसैन, नितिन सोलंके ,अमोल काळे, पवन भोयर,सचिन बोंडे,अवि जगदाळे,मोहन एखंडे सह अमरावती बडनेराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited BY - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT