Yukta Biyani Youngest Pilot In India Saam Tv
महाराष्ट्र

Youngest Pilot In India: नांदेडच्या लेकीने घातली आभाळाला गवसणी, वयाच्या 19 व्या वर्षी झाली पायलट

Nanded News: वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी पायलट बनून नांदेडच्या या मराठमोळ्या लेकीनं नवा रेकॉर्ड केलाय. देशात सगळ्यात कमी वयाची पायलट बनण्याचा बहुमान या मराठमोळ्या तरुणीनीने मिळवलाय.

साम टिव्ही ब्युरो

>> प्रसाद जगताप

Yukta Biyani Youngest Pilot In India:

वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी पायलट बनून नांदेडच्या या मराठमोळ्या लेकीनं नवा रेकॉर्ड केलाय. देशात सगळ्यात कमी वयाची पायलट बनण्याचा बहुमान या मराठमोळ्या तरुणीनीने मिळवलाय. ज्या वयात तरुणांना करीयरचा मोठा प्रश्न भेडसावतो, त्याच वयात या तरुणीने आभाळाला गवसणी घातलीये.

ज्या तरुणांना काय करावं? आणि कुठलं करीयर निवडावं? असा प्रश्न आ वासून उभा राहतो. त्याच वयात या तरुणीने आभाळाला गवसणी घातलीये. नांदेडच्या युक्ता बियानीने वयाच्या 19व्या वर्षी पायलट बनून नवीन इतिहास रचलाय. युक्ताने तब्बल 200 तास विमान चालवून स्वत:ला स्वत:ची प्रतिभा सिद्ध केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लहाणपणापासून पायलट बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी युक्ता आज खरोखरची पायलट झालीये पण, युक्ताचा हा प्रवास सोप्पा नव्हता, तीला आपल्या वयापेक्षी कितीतरी पटीने पुढचा विचार करुन ध्येय गाठायचं होतं. यापूर्वी 21 वर्षांच्या तरुणीने पायलट बनण्याचा बहुमान पटकावला होता. युक्ताला हा रेकॉर्ड मोडायला अथक परीश्रम आणि चाकाटीची गरज होती. ही सगळी आव्हानं पेलायला युक्ता तयार होती. तीने बारावी झाल्या झाल्या मुंबई गाठली. युक्ताने मुंबईत 6 महिने विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेतलं. यानंतर युक्ताची बारामती येथील फ्लाईंग स्कुलमध्ये निवड झाली. या प्रशिक्षणादरम्यान युक्ताने तब्बल 200 तास विमान चालवलं आणि आपल्या पायलट बनण्याच्या स्वप्नावर तीने शिक्कामोर्तब केलं.  (Latest Marathi News)

युक्ता आता लवकरच एअर इंडियात अप्लाय करणार आहे. तिथं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर एअर इंडियात सेवा देण्याचं तिने ठरवलंय. युक्ताच्या या गरुडझेपमूळे तिच्या कुटुंबियांचं उर भरुन आलंय. युक्ताने फक्त तिच्या कुटुंबियांचंच नाही, तर ज्या मातीतून ती येते, त्या मातीलाही आभाळापर्यंत पोहचवलंय. लेक काय करु शकते? आणि तिला का शिकू दिलं पाहीजे याचं उत्तम उदाहण युक्ता आहे.

जमिनीवरुन आभाळाकडे डोळे पाहणाऱ्या कितीतरी लोकांसाठी युक्ता एक ज्वलंत उदाहरण आहे. आपण ठरवलंच तर आभाळालाही गवसणी घालू शकतो आणि या प्रवासात वय हे निव्वळ आकडे दाखवतात. हे युक्ताने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bahadurgad Fort History: छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला बहादूरगड, वाचा इतिहास

Skin Care Tips: दिवाळीत दिसा सुंदर! या 3 सोप्या घरगुती उपायांनी मिळवा नॅचरल ग्लो

Dhanteras Puja: धनत्रयोदशीची पूजा कशी करायची? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि साहित्य

Maharashtra Live News Update : निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

Bigg Boss 19: 'तू खूप निर्लज आणि इरिटेटिंग...'; शेहबाजवर संतापला सलमान खान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT