youths pelted stones on bus demanding maratha reservation saam tv
महाराष्ट्र

Maratha Arakshan Andolan : सातारा - विजयपूर बसवर दगडफेक, प्रवासी जखमी

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर / विजय पाटील

Maratha Andolan : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात सकल मराठा समाजाच्या वतीने आजही (मंगळवार) आंदाेलन सुरु आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मराठा आंदाेलकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसला लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. बहुतांश ठिकाणी बसवर हाेत असलेली दगडफेक लक्षात घेता एसटी महामंडळ बस सेवा तात्पूरत्या स्वरुपात बंद ठेवत आहे. (Maharashtra News)

काेल्हापुर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी एसटीवर तुफान दगडफेक झाली. शिरोळ तालुक्यातील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या समोर काहींनी बसवर दगडफेक केली. ही बस कुरुंदवाडहून पुण्याला निघाली हाेती.

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत युवकांनी एसटीवर दगडफेक केल्याची माहिती प्राप्त झाली. या घटनेची शिरोळ पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दगडफेकीत प्रवासी किरकोळ जखमी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जत जवळ कर्नाटक सीमेवर बसवर दुपारच्या सुमारास दगडफेक झाल्याची घटना समाेर आली आहे. कर्नाटक राज्याच्या एसटी बसवर दगडफेक झाली आहे. या दगडफेकीत काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

दगडफेकीमुळे बसचे नुकसान

बसच्या चालक आणि वाहकाकडून मिळालेल्या माहितीनूसार जत - विजयपुर मार्गावर सातारा - विजयपूर बसवर दुचाकीवर आलेल्या काहींनी घोषणाबाजी करत बसवर दगडफेक केली. या दगडफेकीनंतर चालकाने माेकळ्या मैदाना बस उभी केली. या दगडफेकीत बसची पुढची काच, बाजूच्या खिडक्यांचा काचा फुटल्याचे दिसून येत आहे. पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT