माजी मंत्री राजेश टोपे (mla rajesh tope) यांच्या पाथरवाला बु गावात आज मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मागणीसाठी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न एका मुलाने केला. आपल्याला मुलाचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणारी त्याची आई या घटनेत गंभीर भाजली. दरम्यान दाेन्ही जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. (Maharashtra News)
सूरज गणेश जाधव या सतरा वर्षीय युवक गेल्या तीन महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सूरज आज घरी असताना त्यांनी मराठा आरक्षणावर चर्चा केल्यानंतर ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून आग लावून घेतली ही बाब लक्षात येताच त्याच्या आईने त्यांच्याकडे धाव घेऊन आग विझवण्याचा पर्यंत केला. या घटनेत आई आणि मुलगा हे दोघेही साठ टक्के भाजले. त्यांना गावाकऱ्यांनी उपचारसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने सूरज हा बारावी नंतर आयटीआय करत हाेता. शिक्षणासाठी वेळोवेळी लागणारी फी भरताना मोठी काटकसर करावी लागत असल्याने त्यातच आर्थिक परिस्थिती खालवल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती सूरजची आई मंगलबाई जाधव यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिला.
सरकार आरक्षणाच्या मुद्यावर ठोस निर्णय घेत नसल्याने या संपूर्ण घटनेला सरकारचं जबाबदार असल्याचं सुरज यांनी म्हटलं आहे. दरम्यान आई आणि मुलगा दोघे ही साठ टक्के भाजले असल्याने डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात रेफर केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.