Gadchiroli News , Mahavitran News, Youth saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli News : दर्शनीत शॉक लागून विद्युत मंडळाच्या युवा कर्मचा-याचा मृत्यू, खांबावरच घडली घटना

या घटनेनंतर गावक-यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.

Siddharth Latkar

- मंगेश भांडेकर

Gadchiroli News : वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढलेल्या 22 वर्षीय युवा कर्मचाऱ्याला जिवंत विद्युततारांचा झटका लागल्याने खांबावरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गडचिरोली तालुक्यातील दर्शनी गावात आज (साेमवार) घडली. (Maharashtra News)

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव वैभव जेंगटे असे आहे. आज (साेमवार) सकाऴी आठच्या सुमारास वैभव हा वीज दुरुस्तीच्या कामासाठी दर्शन गावात पोहोचला. गावातील वीज बंद करून ताे खांबावर चढला.

त्यावेळी त्याने विद्युत तारांना स्पर्श केला असता त्याला झटका बसला आणि ताे तारांना चिकटून राहिला. दरम्यान जिवंत विद्युत तारांना वैभवचा स्पर्श झाला असावा आणि त्यातच त्याच्या खांबावरच मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

ही घटना घडताच गावकऱ्यांनी विद्युत खांबाच्या येथे मोठी गर्दी केली. या घटनेनंतर काहींनी याची माहिती पाेलिसांनी दिली. तसेच काही गावक-यांना विद्युत वितरण कंपनीस कळवले. दरम्यान बराच वेळ उलटूनही वीज विभागाचे कोणतेही अधिकारी गावात पोहोचले नव्हते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT