Shirpur News, Latest Marathi News, Shirpur Latest Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Shirpur News : पिस्तुलानं स्वतःवर गोळी झाडून हर्षल माळीनं केली आत्महत्या

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर (shirpur) शहरातील रामसिंग नगर येथील रहिवासी हर्षल भिका माळी (harshal mali) या युवकाने (youth) रात्री घरात झालेल्या किरकोळ वादातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास शिरपूर शहर पाेलीस (police) करीत आहेत. (Shirpur News)

याबाबत अधिक माहिती अशी : रामसिंग नगर येथील हर्षल माळी याची कुटुंबियांसमवेत रात्री अकरा वाजता किरकोळ वाद झाला. या वादाचा राग मनात धरत त्याने थेट आपल्या डोक्यात पिस्तूलने गोळी झाडली. घरच्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हर्षलला तात्काळ शिरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी तात्काळ हर्षलची परिस्थिती बघत त्याला धुळे येथील हिरे वैद्यकीय शासकीय रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली. हर्षलला धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी हर्षलला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या संदर्भात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत. (Latest Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवारांच्या नातीचा लग्नातला रॉयल लूक, भरजरी लेहेंग्यात सजली नवरी; पाहा Unseen Photos

Accident News : बर्थडेच्या दिवशीच काळाचा घाला; भरधाव कार अपघातात फुटबॉलपटू आणि तरुणीचा मृत्यू

Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! रेल्वे रुळाखाली 'अंडरपास' अन् वर 'फ्लायओव्हर'; असा सुटणार वाहतुकीचा वेढा

Maharashtra News Live Update : सहा बंडखोर खासदार मुंबईत दाखल

Child swallowed magnet: धक्कादायक घटना! खेळता खेळता सात वर्षांच्या मुलीने गिळला चुंबक, डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव

SCROLL FOR NEXT