rohit patil / nitin gadkari विजय पाटील
महाराष्ट्र

रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेलं काम झालं असं समज..केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच्या भेटीचा किस्सा पाटील यांच्याकडून शेअर..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी दिल्लीत भेट घेतली.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राष्ट्रवादीचे (NCP) युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतरचा अनुभव रोहित पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला. "दिल्ली (Delhi) मध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे. या वाक्याची प्रचिती आली आणि रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेलं काम झालं असं समज" हे वाक्य धीराचे होते, असे रोहित पाटील यांनी गडकरीच्या भेटीनंतर सोशल मीडियावर (Social media) या भेटीचा अनुभव शेअर केला आहे. त्याचबरोबर कवठेमहांकाळ नगरपंचायती बाबत माहिती घेऊन तिथे मिळालेल्या यशाबद्दल आपले अभिनंदन केल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले आहे.

हे देखील पहा-

कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी (नागज- सांगोला महामार्ग ) येथे ब्रीज अंडरपास उपलब्ध करून दिला जावा आणि सदरचा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग (National Highways) म्हणून ग्राह्य केला जावा अशी विनंती रोहित पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना दिल्लीत भेट घेऊन केली. यावेळी गडकरी यांनी या कामांसाठी त्यांनी सकारात्मक दृष्टीने निर्देश देत लवकरच हे दोन्ही काम होतील अशी हमी दिली. त्याचबरोबर साहेबांनी कवठेमहांकाळ नगरपंचायती बाबत माहिती घेऊन अभिनंदन केले आहे.

केवळ भाजपच नाही तर विरोधी पक्षातील नेतेही नितीन गडकरी यांच्या कामाच्या शैलीचे फॅन आहेत. रोहित पाटील यांनाही गडकरींच्या कामाचा असाच अनुभव आला आणि ते भारावून गेले. त्यामुळेच त्यांनी नितीन गडकरी यांचं कौतुक करणारी आणि आभार मानणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT