किरीट सोमय्या देशद्रोही माणूस; राऊतांचे गंभीर आरोप

शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut/ kirit somaiya
Sanjay Raut/ kirit somaiya Saam TV
Published On

मुंबई: शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सतत भ्रष्टाचाराचे (corruption) आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्याकरिता जमा केलेले पैसे राज्यपाल (Governor) कार्यालयामध्ये पोहचले नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही माहिती समोर आली असल्याचे शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी यावेळी सांगितले आहे.

हे देखील पहा-

हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा, असे आव्हान देखील राऊत यांनी केले आहे. सोमय्या हे सीए असल्याने असा पैसा कसा पचवायचं याची त्यांनी माहिती असल्याचे देखील संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याविषयी ही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयामध्ये असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. ही माहिती गेल्या महिन्यात आली असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले आहे.

Sanjay Raut/ kirit somaiya
हळदी समारंभात हवेत गोळीबार; नवरदेवासह मित्रांविरोधात गुन्हा दाखल

आयएनएस विक्रांत भंगारामध्ये काढण्याविरोधामध्ये किरीट सोमय्या यांनी आंदोलन केले होते. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी त्यांनी लोकांकडून निधी जमवला होता. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली होती. या दरम्यान ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी केला होता. सोमय्या यांच्याबरोबरच इतर नेते देखील सहभागी होते. मात्र, या भ्रष्टाचाराच्या कटाचे प्रमुख सोमय्या होते असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com