Latur Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime: पोलिस भरतीच्या फीसाठी पैसे दिले नाही, संतापलेल्या तरुणाने बापाला जागीच संपवलं; लातूर हादरले

Latur Crime: लातूरमध्ये तरुणाने आपल्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस भरतीच्या फीसाठी पैसे न दिल्यामुळे या तरुणाने हे धक्कादायक कृत्य केले.

Priya More

संदीप भोसले, लातूर

लातूरमध्ये पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने आपल्या जन्मदात्या बापाची निर्घृण हत्या केली. पोलिस भरतीच्या फीसाठी पैसे न दिल्याने संतापलेल्या तरुणाने बापाला जागीच संपवलं. लातूरच्या चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावामध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे लातूर जिल्हा हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस भरतीसाठी पैसे न देता घरातील सिलेंडरसाठी पैसे दिले. या रागातून तरुणाने आपल्या वडिलांना मारहाण केली. काठीने मारहाण करत असताना वडिलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या वडिलांना तात्काळ गावकऱ्यांनी रुग्णालयात नेले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

काशिनाथ पांचाळ (वय ७० वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अजय काशिनाथ पांचाळ (वय २४ वर्षे) असं आरोपीचे नाव आहे. काशिनाथ भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते. पण सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत होते.

काशिनाथ यांचा मुलगा चापोली येथे महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो पोलिस भरतीची तयारी करत आहे. त्याने वडिलांकडे भरतीसाठी फी भरण्यासाठी पैसे मागितले होते. पण सतत पडणाऱ्या पावसामुळे घरातील चुलीसाठी वापरण्यात येणारी लाकडं भिजली होती. त्यात घरातील गॅसही संपला होता. त्यामुळे काशिनाथ यांनी बायकोला सिलेंडर खरेदीसाठी पैसे दिले.

यावरून काशिनाथ यांचा मुलगा त्यांना जाब विचारू लागला. यावरून त्यांच्यात भांडण झाले आणि रागाच्या भरात त्याने काशिनाथ यांच्या डोक्यात काठी मारली. या घटनेत अधिक रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चाकूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विदर्भात काँग्रेसची ताकद वाढली, माजी आमदारासह अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश

Sarva Pitru Amavasya 2025: सर्व पितृ अमावस्येला या ४ ठिकाणी लावा दिवा, लक्ष्मी अन् पितर दोन्ही होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update: नांदेडच्या मुखेड शहरात भीषण अपघात, 7 ते 8 जण गंभीर

Shocking : पत्नीला अंघोळ करताना तरुणाने पाहिलं, व्हिडीओ बनवून पती विषारी औषध प्यायला अन् पुढे...

बस झालं ना दादा... अजित पवारांसामोरच धनंजय मुंडे संतापले | VIDEO

SCROLL FOR NEXT