Nashik News, Mobile saam tv
महाराष्ट्र

Crime News : मम्मी पप्पांचा डाेळा लागताच युवकाने केले गंभीर कृत्य; साेसायटीतही चर्चा

सातपूर पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

Nashik Crime News : नवीन माेबाईल खेरदी करण्यासाठी आई -वडील पैसे देत नसल्याने युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सातपूर परिसरातील श्रमिक नगरात मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

अक्षय अरुण खेताडे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पाेलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार अक्षय हा सध्या बेराेजगार हाेता. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याचा माेबाईल (mobile) हरविला हाेता.

त्यामुळे ताे आई वडिलांकडे नवीन माेबाईल घेण्यासाठी वारंवार पैशांचा तगादा लावत हाेता. मात्र, मद्याची नशा करत असल्याने त्याच्या आईने त्याला माेबाईल खरेदीसाठी पैसे दिले नाही. त्यामुळे ताे नैराश्यात हाेता.

दरम्यान शुक्रवारी रात्री एक ते दीड वाजता अक्षयने साेसायटीतील घराच्या दरवाज्याची कडी बाहेरुन लावून घेतली. त्यानंतर ताे चाैथ्या मजल्यावर गेला. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच त्याला कुटुंबाने जिल्हा रुग्णालयात (hospital) दाखल केले. मात्र, डाेक्याला गंभीर दुखापत व अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत सातपूर पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flipkart BBD Sale: मोबाईलप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! Google Pixel 9 वर बंपर ऑफर, जाणून घ्या किंमत

Mrunal Dusanis: 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम मृणाल दुसानिस सध्या काय करते? तुम्हाला माहितीये का

Maharashtra Live News Update: नळदुर्गमध्ये सकल हिंदू समाजाने काढला मुक मोर्चा

Satara Tourism: आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभव हवा असेल तर साताऱ्यातील 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Asia Cup 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT