youth from karad drowned in kelavali waterfall near satara Saam Digital
महाराष्ट्र

Satara Kelavali Waterfall : केळवली धबधब्‍यात क-हाडचा युवक बेपत्ता, शाेधासाठी शिवेंद्रराजे ट्रेकर्सचे पथक उतरले डाेहात

youth from karad drowned in kelavali waterfall near satara: पाेलिसांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने त्यांनी युवकाच्या शाेधासाठी छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स यांचे पथक बाेलाविले.

ओंकार कदम

सातारा शहरानजीकच्या घाट माथ्यावर दमदार पाऊस पडत आहे. यामुळे शहरानजीकचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. रविवारी सातारा नजीकच्या केळवली धबधब्यात एक युवक बुडाला. या युवकांचा सातारा तालुका पोलिसांसह छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स यांच्या पथकाकडून धबधबा परिसरात आजही शोध सुरू आहे.

सातारा शहरानजीक ठाेसघेर, कास, वज्राई, भांबवली, केळवली आदी धबधबे आहेत. हे धबधबे पाहण्यासाठी राज्यातून पर्यटक येऊ लागले आहेत. रविवारी केळवली येथील धबधबा परिसरात कराड शहरानजीकच्या सैदापूर येथील युवक बुडाल्याची माहिती पाेलिसांना मिळाली.

पाेलिसांनी तातडीने हालचाली करुन घटनास्थळ गाठले. यावेळी त्यांच्या समवेत आहे छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सचे पथक देखील हाेते. अंधार पडल्याने रविवारी सायंकाळी युवकाची शाेध माेहिम थांबवली. आज (साेमवार) पुन्हा युवकाचा शाेध घेण्यात येत आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ऋषिकेश रमेश कांबळे (वय 22) असे धबधब्याच्या पाण्यात बुडालेल्या युवकाचे नाव आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन

Maharashtra News Live Update: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू

आता जमिनीची वाटणी होणार मोफत, फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Earthquake : मणिपूरला भूकंपाचे हादरे! ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Gold Rate Today: खुशखबर! चांदी ₹१०,०००नी स्वस्त ! सोन्याचे दर किती? वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

SCROLL FOR NEXT