स्वातंत्र्यदिनी शिवनेरीवर तरुणांची सायकल स्वारी  रोहिदास गाडगे
महाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनी शिवनेरीवर तरुणांची सायकल स्वारी

पुणे आणि परिसरातील 100 हुन आधिक सायकलस्वारांनी 15 ऑगस्टच्या निमित्ताने शिवनेरी किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होऊन स्वातंत्र्यदिन साजरा केला.

रोहिदास गाडगे

जुन्नर : आज देशभरात 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा होत असताना, पुणे आणि परिसरातील 100 हुन आधिक सायकलस्वारांनी 15 ऑगस्टच्या निमित्ताने शिवनेरी किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होऊन अभिवादन करत स्वातंत्र्यदिन साजरा केला. इंडो ॲथलेटीक सोसायटीच्या वतीने या सायकल राईडचे आयोजन केले होते.

हे देखील पहा -

यंदा शिवनेरी राईडचे दुसरे वर्ष होते. शिवजन्मभुमीत आल्यानंतर नायरायणगाव येथे चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी परेश बोचरे यांच्या शेतात ग्रामीण पध्दतीने जेवणाचे आयोजन तसेच रात्री भक्तभवन-ओझर येथे मुक्काम व जेवणाची सोय शिवजन्मभुमी फाउंडेशन-शिर्डी सायकलवारी टीमच्या वतीने करण्यात आली होती.

यावेळी "सायकल चलाओ-कोरोना हटाव, पोलुशन-पोलुशन सायकल इस द सोल्युशन"चा नारा या सायकलस्वारांनी दिला. या सायकल राईड मध्ये महिलांनीही सहभाग नोंदवला. ओझर येथे सहभागी सायकलस्वारांना मेडलचे वाटप करण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्यायम नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT