nagpur, Nagpur Crime News, Girl Molested saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News : चॉकलेटच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार, युवकास अटक; नागपुर पाेलिसांची कारवाई

पाेलिसांनी तात्काळ हालचाली करुन नराधमास अटक केली.

संजय डाफ

Nagpur Crime News : चॉकलेट देताे असे सांगून एका चार वर्षाच्या मुलीवर युवकाने अत्याचार केल्याची घटना नागपूरात (nagpur) उघडकीस आली आहे. कोराडी येथे घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी चाैकशीअंती एका युवकाला अटक केली आहे. (Maharashtra News)

पाेलिसांनी (police) दिलेल्या माहितीनूसार गोलू उर्फ हरिओम शिवदयाल सनोडिया (राहणार. बंडोल, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या युवकाचे (youth) नाव आहे. पीडित मुलीचे वडील मध्य प्रदेशातील आहेत. कामाच्या शोधत पीडित मुलीचे आई-वडील नागपुरात आले हाेते.

कोराडी परिसरात एका इमारतीचे काम करून झोपडीत राहतात. याच परिसरात गोलूही राहतो. १५ एप्रिलला चॉकलेट देताे असे सांगून गोलूने मुलीला झोपडीत नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. मुलगी रडत घरी आल्याने मुलीला काय झाले हे तिच्या आई-वडिलाला कळले नाही. तिला अधिकच त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात नेले.

वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती डॉक्टरांनी मुलीच्या कुटुंबियांना दिली. त्यावेळी कुटुंबियांला धक्का बसला. कुटुंबियांनी पाेलिसांत धाव घेत सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पाेलिसांनी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनूसार गाेलू याच्यावर गुन्हा दाखल. त्यानंतर त्याला चाैकशी करुन अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदना आणि शस्त्र पूजन

Shiv Sena Dussehra Melava: शिंदे अन् ठाकरेंची आज तोफ धडाडणार, दसरा मेळाव्यातून शक्तिप्रदर्शनाची तयारी; कुठे अन् किती वाजता होणार सभा?

जगभरात Gen Z आंदोलनांचा भडका, सत्ताधाऱ्यांंविरोधात नागरिक रस्त्यावर

Gokul Election 2026: सतेज पाटलांनी विरोधकांना दाखवलं आस्मान; वाचा विजयी उमेदवारांची यादी

Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

SCROLL FOR NEXT